मालेगाव : तालुक्यातील ५० ग्रामपंचायतींच्या सरपंच- उपसरपंचपदांची निवड शुक्रवारी करण्यात आली. त्यात काही ग्रामपंचायतीत सरपंच- उपसरपंचपदांची निवड बिनविरोध झाली.झोडगे : सरपंचपदी पंडित काळू देसले यांची बिनविरोध निवड करण्यात आली. उपसरपंचपदी बेबीबाई भास्करराव देसले यांची निवड झाली. निवडणुकीनंतर नवनिर्वाचित सरपंच पंडित देसले व उपसरपंच बेबीबाई देसले यांनी गावातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून आनंद साजरा केला. यावेळी सर्व ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.----निमगाव सरपंचपदी सरला जगतापमालेगाव : तालुक्यातील निमगाव येथील ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी कर्मवीर शिवरामदादा हिरे पॅनलच्या सरला तुषार जगताप यांची, तर उपसरपंचपदी आकाश मधुकर हिरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी ग्रामपंचायत सदस्य अरुण हिरे, दशरथ हिरे, निंबा हिरे, शरद ठाकरे, योगिता नंदाळे, भारती हिरे, शीला हिरे, रूपाली अहिरे, ऊर्मिला पाटील, सुनंदा हिरे, रेखा हिरे, मीना हिरे आदींची उपस्थिती होती. निवडीनंतर कर्मवीर शिवरामदादा हिरे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून आनंद व्यक्त करण्यात आला. यावेळी पॅनलचे सूत्रधार माजी जि.प. अध्यक्ष मधुकर हिरे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी चिंतामण हिरे, दुर्गादास नंदाळे, वसंत हिरे, दत्तात्रय हिरे, संदीप गाढे, निवृत्ती मोरे, अरुण पाटील आदी उपस्थित होते.
मालेगाव तालुक्यातील ग्रामपंचायत सरपंच-उपसरपंचपदांची निवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2021 00:42 IST