शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
3
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
4
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
5
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
6
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
7
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
8
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
9
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
10
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
11
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
12
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
13
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
14
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
15
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
16
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
17
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
18
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
19
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
20
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प

स्वत:साठीच निवडलं चॅलेंज, यशही मिळवलं!

By meghana.dhoke | Updated: December 8, 2018 23:00 IST

नाशिकचे पोलीस आयुक्त रविंद्र सिंगल यांनी अलिकडेच आयर्नमॅन होण्याचा बहुमान मिळवला. त्या पाठोपाठ त्यांच्या कन्येने यशाला गवसणी घातली.

ठळक मुद्दे आर्यन स्पर्धेतील पहिली विजेती आशियायी तरूणी रविजा सिंगलआंनदी होऊन रडणं ती ने पहिल्यांदाच अनुभवलं...

नाशिक रविजा सिंघल. १९ वर्षांची तरुणी. आर्यनमॅन ही अत्यंत खडतर स्पर्धा तिनं नुकतीच आॅस्ट्रेलियात पूर्ण केली. इतक्या लहान वयात ही स्पर्धा पूर्ण करणारी ही पहिली आशियाई तरुणी आहे. ३.८ किलोमीटर पोहणं, ९० किलोमीटर सायकलिंग आणि ४२.२ किलोमीटर पळणं हे सारं तिनं १६ तास ५ मिनिट ४५ सेकंदात पूर्ण केलं. नाशिकचे पोलीस आयुक्त रविंद्र सिंगल यांनी अलिकडेच आयर्नमॅन होण्याचा बहुमान मिळवला. त्या पाठोपाठ त्यांच्या कन्येने यशाला गवसणी घातली. या यंगेस्ट आयर्नमॅन लेडीशी ही खास बातचित.आयर्नमॅन स्पर्धेत उतरावं असं का वाटलं?- मी राष्टÑीय स्तरावर जलतरणपटू म्हणून विविध स्पर्धेत भाग घेत होतेच. पण एक टप्प्यात असं वाटलं काहीतरी वेगळं करावं, असं काहीतरी जे चॅलेंजिग असेल, जे मला चॅलेजिंग वाटेल. पुढं या आयर्नमॅन स्पर्धेविषयी कळलं. मी जलतरणपटू असले तरी मी कधीच सायकलिंग केलं नव्हतं किंवा कधी मी पळतही नव्हते. मग वाटलं हे करु. तेव्हाच कळलं की, आजवर माझ्या वयाच्या कुठल्याच भारतीय काय आशियाई मुलीनंही हे केलेलं नाही. आता तर आव्हान दुप्पट झालं, मग ठरवलं अवघड तर अवघड पण हे करायचंच!अर्थात सोपा नसेलच हा प्रवास, स्वत:ला कसं ‘तयार’ केलंस?

- सोपा तर नव्हताच. पण माझे वडील (पोलीस आयुक्त रविंद्र सिंगल) सोबत होेते. ते स्वत: सराव करत होते. मात्र या स्पर्धेसाठीचं प्रशिक्षणच पूर्ण वेगळं होतं. मला घरुन पाठिंबा होता, उत्तम प्रशिक्षक होते. मात्र हे सारं घडलं ते घडण्याची एक प्रक्रिया होती. हळूहळू ते माझ्यातही मुरायला लागलं की, हे आव्हान आपण पेलतोय. आपण करणार आहोत हे सारं. अर्थात कुठलाही खेळ असो, सुरुवातीला सराव करताना वेदना होतात. शरीर तयार नसतं, आपण का करतोय हे, कशासाठी असंही वाटतं. पण मग मीच स्वत:ला सांगत होते, हे चॅलेंज तू स्वत:साठी निवडलं आहेस. सोडून देण्याचा प्रश्नच नव्हता, खेळाडू कधीच अशी मैदानातून माघार घेत नसतो.

जिंकल्यानंतर..? आपण जिंकलो, केलं आपण पूर्ण केलं स्वप्न हे आता जाणवतं तेव्हा..?- मला ती फिनिश लाइन तिरंगा हातात घेऊनच करायची होती. ते मी केलं.. त्याक्षणी जे मी रडलेय. ते असं आनंदी होऊन रडणं मी पहिल्यांदा अनुभवलं. त्यानंतर माझे बाबा जेव्हा म्हणाले, ‘बेटा अच्छा किया..!’ त्या तीन शब्दांनी मला दिलेला आनंदही मोठा आहे. तेव्हा वाटलं, धिस इज बिग डील!

टॅग्स :NashikनाशिकIndiaभारत