शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

फुलेनगरमधील गावठी दारूची हातभट्टी जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2018 01:36 IST

फुलेनगर परिसरातील कालिकानगर येथे राजरोसपणे चालणाऱ्या गावठी हातभट्टीची दारू तयार करणाºया अड्ड्यावर पंचवटी पोलिसांनी मंगळवारी (दि.२८) सकाळी छापा मारला़ याठिकाणी असलेले १९ हजार रुपये किमतीचे गावठी दारू बनविण्यासाठी

पंचवटी : फुलेनगर परिसरातील कालिकानगर येथे राजरोसपणे चालणाऱ्या गावठी हातभट्टीची दारू तयार करणाºया अड्ड्यावर पंचवटी पोलिसांनी मंगळवारी (दि.२८) सकाळी छापा मारला़ याठिकाणी असलेले १९ हजार रुपये किमतीचे गावठी दारू बनविण्यासाठी  लागणारे सुमारे ८०० लिटर रसायन तसेच हातभट्टीची तयार गावठी दारू नष्ट केली आहे. याप्रकरणी संशयित रमेश नागनाथ जाधव या संशयिताविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.  फुलेनगर परिसरातील कालिकानगर येथे राहणारा संशयित जाधव हा हातभट्टीची गावठी दारू तयार करीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.  या माहितीनंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांनी घटनास्थळी पोलीस कर्मचारी पाठवून खात्री केली असता एका बंद खोलीत संशयित जाधव हा गावठी हातभट्टीची दारू तयार करीत असल्याचे आढळून आले. त्यानंतर पोलिसांनी मंगळवारी सकाळी या हातभट्टीवर छापा टाकला असता गावठी दारू बनविण्यासाठी लागणारे सुमारे ८०० लिटर रसायन तसेच दोन ड्रममध्ये ३० लिटर तयार गावठी दारू त्या ठिकाणी पोलिसांना आढळून आली. घटनास्थळावरून गावठी दारू तसेच सुमारे आठशे लिटर रसायन जागेवरच नष्ट करून पोलिसांनी मोठे पातेले, प्लॅस्टिक ड्रम, गॅस शेगडी, सिलिंडर असा मुद्देमाल जप्त केला आहे.  फुलेनगर परिसरात राजरोसपणे सुरू असलेल्या गावठी हातभट्टीच्या अड्ड्यावर पंचवटी पोलिसांनी छापा टाकून हातभट्टी उद्ध्वस्त केली आहे. फुलेनगरप्रमाणेच पंचवटी परिसरातील अन्य काही भागातही खुलेआमपणे गावठी दारू बनविण्याचे अड्डे असून, पोलीस त्याकडे लक्ष वेधणार का? असा सवाल नागरिकांनी केला आहे.

टॅग्स :Policeपोलिसliquor banदारूबंदी