शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

सफाई कर्मचाऱ्यांच्या सेल्फी हजेरीबाबत अहवाल मागविला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2018 18:36 IST

शासनाचे निर्देश : संघटनांचा सेल्फी हजेरीला विरोध

ठळक मुद्देकर्मचारी संघटनांनी याबाबत नगरविकास खात्याच्या प्रधान सचिवांची भेट घेऊन निवेदन सादर केले होतेआयुक्तपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर तुकाराम मुंढे यांनी शहरातील स्वच्छतेबाबतचा मुद्दा गांभीर्याने घेतला आहे.

नाशिक - महापालिकेच्या आरोग्य विभागाने सफाई कर्मचा-यांची सेल्फी हजेरी सुरू केल्यानंतर कर्मचारी संघटनांनी त्यास विरोध दर्शविला असतानाच आता शासनानेही त्याबाबतचा वस्तुनिष्ठ अहवाल महापालिका प्रशासनाकडून मागविला आहे. कर्मचारी संघटनांनी याबाबत नगरविकास खात्याच्या प्रधान सचिवांची भेट घेऊन निवेदन सादर केले होते.आयुक्तपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर तुकाराम मुंढे यांनी शहरातील स्वच्छतेबाबतचा मुद्दा गांभीर्याने घेतला आहे. त्या पार्श्वभूमीवर त्यांनी अगोदर अन्य विभागात वेगवेगळ्या पदांवर काम करणा-या ३८९ सफाई कर्मचा-यांना मूळ सेवेत परत जाण्याचे आदेश काढले.त्यानंतर ४५० सफाई कर्मचा-यांच्या बदल्या केल्या. या बदल्यांना सफाई कामगार संघटनांकडून विरोध झाल्यानंतर त्यातील १६१ महिला सफाई कर्मचा-यांच्या बदल्या रद्द करणे प्रशासनाला भाग पडले. त्यापाठोपाठ आरोग्य विभागाने सफाई कर्मचा-यांची सेल्फी हजेरी घेण्यास सुरुवात केली. परंतु, या सेल्फी हजेरीलाही सफाई कर्मचा-यांच्या संघटनांनी तिव्र विरोध दर्शविला. आयुक्तांना निवेदन देऊनही त्यात काहीच बदल होत नसल्याने वाल्मिकी मेघवाळ मेहतर समाज संघर्ष समितीचे पदाधिकारी सुरेश दलोड आणि सुरेश मारू यांनी शासनाच्या नगरविकास खात्याच्या प्रधान सचिवांची भेट घेत त्यांना निवेदन सादर केले. त्यानुसार, नगरविकास विभागाने या सेल्फी हजेरीबाबतचा वस्तुनिष्ठ अहवाल महापालिका प्रशासनाकडून मागविला आहे.पर्दा पद्धतीला बाधासंघर्ष समितीने आयुक्तांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, वाल्मिकी, मेघवाळ, मेहतर समाजात पर्दा पद्धत आहे. महिला आपला चेहरा परक्यांना दाखवित नाहीत. त्यामुळे, सफाई कर्मचारी महिलेची जबरदस्तीने सेल्फी हजेरी घेणे पर्दा पद्धतीला बाधा आणणारे ठरेल. वास्तविक सफाई कर्मचा-यांना त्यांच्या कामाच्या ठिकाणी मूलभूत सोयी-सुविधा उपलब्ध करून देणे प्रशासनाची जबाबदारी आहे. ती उपलब्ध करून न देता सेल्फी हजेरीचा आग्रह धरणे चुकीचे असल्याचे सुरेश दलोड, सुरेश मारू, ताराचंद पवार व अनिल बेग यांनी म्हटले आहे.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाSelfieसेल्फी