शहरं
Join us  
Trending Stories
1
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
2
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
3
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
4
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
5
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
6
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
7
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
8
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
9
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
10
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
11
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
12
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
13
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
14
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
15
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
16
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
17
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
18
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
19
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
20
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
Daily Top 2Weekly Top 5

खते ,बियाणे, किटकनाशकांच्या खरेदी विक्रीवर नजर ; नाशकातील कृषी सेवा केंद्रांची झाडाझडती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2020 16:09 IST

नाशिक जिल्ह्यात कृषी विभागाने कृषी सेवा केंद्रांची तपासणी करण्याची मोहीम हाती घेतली आहे. जिल्ह्यात ४८ निरीक्षकांच्या देखरेखीत पुढील दहा दिवसांत जिल्हाभरातील सुमारे साडेसात हजार  दुकानांतील खते, बि-बियाणे व किटकनाशकांचा साठा, विक्री व उपलब्धतेविषयी तपासणी करण्यात येणार आहे.

ठळक मुद्देजिल्ह्यातील कृषी केंद्र तपासणीसाठी दहा दिवसांची मोहीम कृषी विभागाच्या 48 निरीक्षकांच्या नियंत्रणात झाडाझडती

नाशिक : जिल्ह्यातील सर्व कृषी सेवा केंद्रांची तपासणी करण्यात येणार असून त्यासाठी तालुकानिहाय नियोजन तयार करण्यात आले आहे. राज्य सरकारमधील कृषीमंत्री दादा भूसे यांनी औरंगाबाद येथे एका दुकानात धकड देत खत विक्रीतील गैरप्रकार उघडकीस आणल्यानंतर नाशिक जिल्ह्यातील कृषी विभागानेही तत्काळ दखल घेत बुधवारपासून (दि.२४) जिल्ह्यातील कृषी सेवा केंद्रांची तपासणी करण्याची मोहीम हाती घेतली आहे. या मोहीमेअंतर्गत  शेतीसाठी आवश्यक खते, बी-बीयाणे, किटकनाशक  औषधांच्या विक्री व साठवणुकीविषी माहिती घेतली जाणार असून  परवानाधारक तसेचे अवैधरीत्या व्यावसाय करणाऱ्या बिगर परवानाधारक दुकानांची या मोहीमेत तपासणी करून कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती कृषी विभागातील सुत्रांनी दिली आहे. नाशिक जिल्हा कृषि विकास अधिकारी कार्यालयाकडून जिल्ह्यातील कृषी सेवा केंद्रांच्या माध्यमातून होणाऱ्या रासायनिक खते, बी-बियाणे व किटकनाशकांच्या खरेदी विक्रीतील गैर प्रकारांना आळा घालण्यासाठी २४ जून ते २ जुलै या कालावधीत विशेष तपासणी मोहीम राबविण्यात येणार आहे. या मोहिमेत कृषीविभागाचे  तालुका अधिकारी कृषी विस्तार अधिकारी, जिल्हास्तरावरील कृषी विकास अधिकारी व तंत्र अधिकारी यांच्यासह कृषी उपंसचालक व विभागीय कृषी तंत्र अधिकारी आदिंसह सुमारे ४८ निरीक्षकांच्या माध्यमातून कृषी सेवा  कें द्रांची तपासणी करण्यात येणार आहे.  जिल्ह्यात जवळपास साडेसात हजार नोंदणीकृत कृषी सेवा कें द्र आहेत. यातील ग्रामीण भागातील कृषी सेवा केंद्रांकडून उपलब्ध खते व बियाण्यासा साठा करून अधिक किंमतीने विक्री करण्याच्या तक्रारी शेतकºयांकडून वाढत आहेत. त्याचप्रमाणे शेतकऱ्यांना बांधापर्यंत खत पोहोचविण्याच्या प्रक्रियेत दुकानदारांना गाडी भाडे मिळत नसल्याने दुकानदारांकडून  खत उपलब्ध नसल्याचा बहाणा सांगीतला जात असल्याच्या तक्रारी वाढल्यान कृषी मंत्री दादाभूसे यांनी स्वत: वेशांतर करून औरंगाबादमधील एका दुकान खत खरेदी करण्याच्या बहाण्याने प्रवेश करून वास्तविकता जाणून घेण्याचा प्रयत्न केला.  त्यानंतर कृषी विभागाला खडबडून जाग आली असून नाशिक जिल्ह्यात ४८ निरीक्षकांच्या देखरेखीत पुढील दहा दिवसांत जिल्हाभरातील सुमारे साडेसात हजार  दुकानांतील खते, बि-बियाणे व किटकनाशकांचा साठा, विक्री व उपलब्धतेविषयी तपासणी करण्यात येणार असून या प्रक्रियेला बुधवार पासून सुरुवात झाल्याची माहिती कृषी विभागाने दिली आहे. 

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्रNashikनाशिकFarmerशेतकरी