शहरं
Join us  
Trending Stories
1
'एक बैठक घेण्यासाठी मनोज जरांगेंना आमदार १०-१५ लाख रुपये देतात'; लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप
2
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
3
पूजाचं ऐकलं अन् पुजारानं हा निर्णय घेतला! निवृत्तीनंतर स्वत: शेअर केली 'अनटोल्ड स्टोरी'
4
सुनेला जाळून मारण्यात मुलाची केली मदत; दिल्लीच्या निक्की भाटी प्रकरणात सासूला अटक!
5
स्कॉर्पिओ, बुलेट, रोख रक्कम आणि सोने; एवढे सगळे देऊनही निक्कीला रोज रात्री मारहाण करायचे, बहिणीने केले धक्कादायक खुलासे
6
विद्यार्थ्याचा पाय घसरला, शिक्षक वाचवायला गेले; वेरुळच्या जोगेश्वरी कुंडात बुडून दोघांचा मृत्यू 
7
'कभी खुशी कभी गम' फेम अभिनेत्री झाली आई, ३४व्या वर्षी दिला गोंडस लेकीला जन्म
8
'सन्मानजनक निरोप द्यायला हवा होता...', पुजाराच्या निवृत्तीवर शशी थरुर यांची भावनिक पोस्ट
9
Ganpati 2025: शिव ठाकरेच्या घरी वाजत गाजत आले गणपती बाप्पा, इतकी सुंदर मूर्ती की नजरच हटेना, पाहा व्हिडीओ
10
Asia Cup 2025: आशिया चषकात सर्वाधिक सामने जिंकणारे टॉप-५ कर्णधार!
11
भारतानंतर आता युरोपचाही अमेरिकेला मोठा धक्का; 'या' दोन देशांनी 'एफ ३५' फायटर जेट्स खरेदीला दिला नकार!
12
राहुल गांधींच्या सुरक्षेत मोठी चूक; तरुण Kiss घेऊन पळाला, व्हिडिओ व्हायरल...
13
राज्यात १७ लाख कर्मचाऱ्यांना बाप्पा पावला! पगाराबाबत सरकारने घेतला महत्त्वाचा निर्णय
14
"मी सोहमला सांगितलंय लग्नानंतर वेगळं राहायचं...", सुचित्रा बांदेकर स्पष्टच बोलल्या, म्हणाल्या- "एकत्र राहून रोज..."
15
मिस्त्री, प्लंबर, फिटरपासून कनिष्ठ अभियंतापर्यंत; मिरा-भाईंदर महानगरपालिकेत विविध पदांसाठी भरती
16
आता त्या गोष्टीवर मी काहीच बोलणार नाही; सचिन-द्रविड अन् MS धोनीचं नाव घेत पुजारा म्हणाला की,..
17
आईस्क्रीम विक्रेत्याला कॉलेज प्लेसमेंटमधून १.८ कोटींचं पॅकेज? व्हायरल Video मागचं 'सत्य'
18
सासू केस ओढून मारायची, पती हुंडा घेऊन...; निक्कीच्या आईने जावयाबद्दल केला धक्कादायक खुलासा!
19
"वडिलांच्या नवीन मर्सिडीजवर विपिनची नजर, ६० लाखांची मागणी", निक्कीच्या भावाने मांडली व्यथा
20
दुसरे घर घेण्याचा विचार करताय? आधी ‘या’ महत्त्वाच्या गोष्टी तपासा, अन्यथा होईल मोठं नुकसान!

अनैतिक संबंधाचे गुपीत उघड झाल्याने बापाने साखरझोपेतच आवळला तरुण मुलाचा गळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2021 18:45 IST

पहाटेच्या सुमारास निलेश याचा जोरजोराने 'आई-आई' असा ओरडण्याचा आवाज कानी आल्याने जयश्री यांनी त्याच्या खोलीत धाव घेतली असता संशयित प्रभाकर हे त्यांच्या हाताने गळा आवळत असल्याचे त्यांना दिसून आले.

ठळक मुद्देपिता-पुत्राच्या नात्याला काळीमा संशयित पित्याला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

नाशिक : पित्याचे विवाहबाह्य संबंधाचे गुपीत मुलाला माहित झाले आणि पत्याने दीड एकर शेती स्वत:च्या प्रेयसीच्या नावावर केल्याने त्यास मुलाने कडाडून विरोधही केला म्हणून मनात राग धरत पोटच्या २८वर्षीय तरुण मुलाचा गळा आवळून जन्मदात्या पित्याने खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी संशयित आरोपी पशुवैद्यकीय अधिकारी प्रभाकर माळवाड यास पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहे..याबाबत पोलिसांकडू मिळालेली माहिती अशी, नाशिक पुणे महामार्गावरील जनरल वैद्यनगर परिसरात राहणारे देवळा पशुसंवर्धन दवाखान्यातील पशुवैद्यक संशयित प्रभाकर माळवाड व त्यांचा मुलगा निलेश माळवाड आणि फिर्यादी आई जयश्री यांनी रविवारी (दि.३) रात्री सोबत जेवण केले. यावेळी मुलगा निलेश याने वडिलांना 'पोल्ट्री फार्म सुरु करु द्या' असे सांगितले. यावेळी संशयित प्रभाकर यांनी त्याला दम देत 'तु काही कामाचा नाही, त्यामुळे मी तुला काहीही देणार नाही' असे सांगत खडसावले. यावेळी दोघा पिता-पुत्रांमध्ये रात्री कडाक्याचे भांडण झाले. जयश्री यांनी मध्यस्तीने त्यांचे भांडण मिटविले. माळवाड दाम्पत्य त्यांच्या खोलीत झोपले व मुलगा नीलेश हा त्याच्या बेडरुममध्ये झोपलेला असताना सोमवारी पहाटेच्या सुमारास निलेश याचा जोरजोराने 'आई-आई' असा ओरडण्याचा आवाज कानी आल्याने जयश्री यांनी त्याच्या खोलीत धाव घेतली असता संशयित प्रभाकर हे त्यांच्या हाताने गळा आवळत असल्याचे त्यांना दिसून आले. यावेळी त्यांनी सोडविण्याचा प्रयत्न केला असता प्रभाकर यांनी स्वत:च्या पत्नीला ढकलून देत नीलेश प्रभाकर माळवाड (२८) यास गळा दाबून त्यास ठार केल्याचे त्याची आई जयश्री यांनी पोलिसांना दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी पोलिसांनी संशयित प्रभाकर यास अटक केली असून जयश्री यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन त्यांच्याविरुध्द खूनाचा गुन्हा दाखल केला आहे.--- 

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयMurderखूनArrestअटक