शहरं
Join us  
Trending Stories
1
"बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचे सरंक्षण करणार..." राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल
2
IPL 2024 MI vs KKR: मुंबई इंडियन्सच्या प्लेईंग XI मधून Rohit Sharma गायब! Hardik Pandya ने टाकला नवा 'डाव'
3
“एकनाथ खडसेंची भूमिका संधीसाधूपणाची, आधी राजीनामा द्या अन् मग प्रचार करा”: गिरीश महाजन
4
कितीही उमेदवार द्या, श्रीकांत शिंदे यांचाच विजय पक्का; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना विश्वास
5
पातूरच्या घाटात भीषण अपघात; सहा जण ठार, चार गंभीर जखमी!
6
"मदतीच्या बदल्यात मदत"; फडणवीसांची भेट, BJPचा प्रचार अन् अभिजीत पाटलांच्या कारखान्याचं सील निघालं!
7
ऑस्ट्रेलियाचा टीम इंडियाला धक्का; कसोटी क्रमवारीत अव्वल! भारताची दुसऱ्या स्थानी घसरण
8
संजय चव्हाण, विजय करंजकरांचे बंड; शांतीगिरी महाराज नाशिकमधून अपक्ष लढणार
9
शरद पवार यांच्या ताफ्यातील दोन वाहने धडकली
10
देशातील कर प्रणालीवर राजीव बजाज यांची टीका, सरकारकडे केली 'ही' मागणी...
11
पाकिस्तान भारताची कॉपी करायला गेला, चीनच्या मदतीनं लॉन्च केलं 'मून मिशन'; झाला 'खेला'!
12
'आम्ही तेथे राहुल गांधींविरोधात जिंकू शकणार नाही...'; भाजपाच्या मुख्यमंत्र्यांचा टोमणा
13
सायकल बिल्डिंगखाली लावली म्हणून पित्रा-पुत्राने केली एकाची हत्या; गिरगावात धक्कादायक प्रकार
14
“उद्धव ठाकरे वीर सावरकरांचे नाव भाषणात घेण्याची हिंमत करु शकतात का?”; अमित शाहांचे आव्हान
15
'भारतावर संकट आले की, राहुल गांधी इटलीला पळून जातात', योगी आदित्यनाथांचा घणाघात
16
अमृता खानविलकर या कारणामुळे सोशल मीडियावर शेअर करत नाही नवऱ्यासोबतचे फोटो, म्हणाली - एकमेकांना...
17
Mouni Roy : "दिवसाला खाल्ल्या 30 गोळ्या, वजन वाढलं, आयुष्य संपलं..."; मौनी रॉयला आला भयंकर अनुभव
18
“राजकारणात माझा जन्म ४ दिवसांचा, पण...”; उज्ज्वल निकम मैदानात, विरोधकांना थेट आव्हान
19
राहुल गांधींनी रायबरेलीतून भरला उमेदवारी अर्ज, रस्त्यावर काँग्रेस कार्यकर्त्यांची गर्दी
20
Share Market: सेन्सेक्स-निफ्टी कोसळले, गुंतवणूकदारांनी 4 लाख कोटी गमावले...

देवळ्यात दुय्यम निबंधकाचा पुन्हा खांदेपालट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2021 9:50 PM

देवळा : येथील मुद्रांक घोटाळा प्रकरण उघडकीस आल्यानंतर जिल्हा मुद्रांक अधिकारी कैलास दवंगे यांनी तत्कालीन दुय्यम निबंधक प्रकाश गांगोडे यांच्याकडून पदभार काढून घेत माधव महाले यांच्याकडे सोपविला होता. आता महाले यांच्याऐवजी स्वप्निल बिरकुरवार यांच्याकडे दुय्यम निबंधक पदाचा कार्यभार सोपविण्यात आला आहे.

ठळक मुद्देमुद्रांक घोटाळा : स्वप्निल बिरकुरवार यांची नियुक्ती

देवळा : येथील मुद्रांक घोटाळा प्रकरण उघडकीस आल्यानंतर जिल्हा मुद्रांक अधिकारी कैलास दवंगे यांनी तत्कालीन दुय्यम निबंधक प्रकाश गांगोडे यांच्याकडून पदभार काढून घेत माधव महाले यांच्याकडे सोपविला होता. आता महाले यांच्याऐवजी स्वप्निल बिरकुरवार यांच्याकडे दुय्यम निबंधक पदाचा कार्यभार सोपविण्यात आला आहे.देवळा तालुक्यात एकाच क्रमांकाचा मुद्रांक दोन वेगवेगळ्या व्यक्तींच्या नावे देऊन खरेदी-विक्री झाल्याची घटना उघडकीस आल्यानंतर मुद्रांक जिल्हाधिकारी कैलास दवंगे यांनी तातडीने कारवाई करत तीन सदस्यांचे चौकशी पथक नेमून त्यांना देवळा येथे पाठवले होते. तपास सुरळीत व्हावा यासाठी जिल्हा मुद्रांक अधिकारी यांनी देवळा येथील तत्कालीन दुय्यम निबंधक प्रकाश गांगोडे यांचा पदभार काढून घेण्याची कार्यवाही करून माधव महाले यांच्याकडे दुय्यम निबंधक पदाचा पदभार सोपविण्यात आला होता. दवंगे यांनी महाले यांना सदर प्रकरणातील दोषींवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले होते. शासनाच्या वतीने महाले यांनी देवळा पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केल्यानंतर त्यांच्याकडून पदभार काढून घेत स्वप्निल बिरकुरवार यांच्याकडे दुय्यम निबंधक पदाचा कार्यभार सोपविण्यात आला आहे.तालुक्यात बनावट मुद्रांक व मुद्रांकावर छेडछाड करून जमीन खरेदी-विक्री करणारे मोठे रॅकेट कार्यरत असल्याची शक्यता वर्तविण्यात येत असल्यामुळे यापूर्वी लाखो रुपयांचे खरेदी-विक्रीचे व्यवहार केलेल्या जनतेच्या मनात साशंकता निर्माण झाली असून मुद्रांक घोटाळा प्रकरणाचा लवकर पर्दाफाश करून यातील सत्य समोर यावे, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.मुद्रांक विक्रेत्यांची संख्या अपुरीदेवळा तालुक्याची निर्मिती झाल्यानंतर सात व्यक्तींना मुद्रांक विक्रीचे परवाने देण्यात आले होते. तालुक्याचा विस्तार व वाढती लोकसंख्या पाहता मुद्रांक विक्रेत्यांची ही संख्या अपुरी होती. दोन महिन्यांपूर्वी मुद्रांक विक्रेता रमाकांत वाघमारे यांचे निधन झाल्यामुळे ती जागा रिक्त झाली आहे. देवळा येथील मुद्रांक घोटाळा प्रकरणात एक मुद्रांक विक्रेता अडकलेला असल्यामुळे त्याचे कामकाज सध्या बंद आहे. सध्या देवळा येथील जुन्या तहसील कार्यालयाच्या आवारात अवघे चार मुद्रांक विक्रेते नागरिकांना सेवा देत आहेत. येथे विविध कामांसाठी येणाऱ्या नागरिकांची गर्दी पाहता मुद्रांक विक्रेत्यांची संख्या अपुरी पडत आहे. यामुळे नागरिकांची गैरसोय होत असून नवीन मुद्रांक विक्रेत्यांची संख्या वाढवावी, अशी मागणी तालुक्यातील नागरिकांनी केली आहे.

टॅग्स :Governmentसरकारnashik collector officeनाशिक जिल्हाधिकारी कार्यालय