दुसरी गुणवत्ता यादी जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2019 12:17 AM2019-07-23T00:17:51+5:302019-07-23T00:18:15+5:30

अकरावी प्रवेशाच्या पहिल्या गुणवत्ता यादीतील प्रवेश झाल्यानंतर सोमवारी (दि.२२) दुसरी गुणवत्ता यादी जाहीर झाली असून, दुसऱ्या यादीत ६६४२ विद्यार्थ्यांची नावे जाहीर झाली आहेत.

Second quality list released | दुसरी गुणवत्ता यादी जाहीर

दुसरी गुणवत्ता यादी जाहीर

googlenewsNext


नाशिक : अकरावी प्रवेशाच्या पहिल्या गुणवत्ता यादीतील प्रवेश झाल्यानंतर सोमवारी (दि.२२) दुसरी गुणवत्ता यादी जाहीर झाली असून, दुसऱ्या यादीत ६६४२ विद्यार्थ्यांची नावे जाहीर झाली आहेत. यामध्ये २४६९ विद्यार्थ्यांना पहिल्या पसंतीचे महाविद्यालय अलॉट झाले असून, या विद्यार्थ्यांना अशा महाविद्यालयात प्रवेश घेणे अनिवार्य आहे. पहिल्या गुणवत्ता यादीत असलेल्या १५ हजार विद्यार्थ्यांपैकी केवळ ८ हजार विद्यार्थ्यांनीच प्रवेश घेतले आहेत. दुसºया यादीत नावे आलेल्या विद्यार्थ्यांना २३ पासून तीन दिवसांत प्रवेश घ्यावा लागणार आहे.
नाशिक महापालिका हद्दीतील कनिष्ठ महाविद्यालयातील अकरावीच्या प्रवेशप्रक्रियेतील दुसºया गुणवत्ता यादीची नावे शिक्षण विभागाने सोमवारी जाहीर करण्यात आली. शहरात २३,८६० प्रवेशासाठी आॅनलाइन प्रक्रिया राबविली जात आहे. अकरावी प्रवेशातील आॅनलाइन प्रवेशप्रक्रियेत पहिल्या गुणवत्ता यादीतील सुमारे सात हजार विद्यार्थ्यांनी पहिल्या पसंतीचे प्रवेश नाकारल्याने त्यांना आता विशेष फेरीपर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे. पहिल्या फेरीतील अपेक्षित प्रवेश झालेले नसताना वेळापत्रकानुसार दुसरी गुणवत्ता यादी जाहीर झाली आहे. दुसºया फेरीत २४६९ विद्यार्थ्यांना पहिल्या पसंतीचे महाविद्यालय मिळाले असल्याने त्यांना प्रवेशाच्या नियमाप्रमाणे या महाविद्यालयात प्रवेश घेणे बंधनकारक आहे. त्याचप्रमाणे १५८१ विद्यार्थ्यांना दुसºया पसंतीचे महाविद्यालय मिळाले आहे, तर १०२६ विद्यार्थ्यांना तिसºया, ६३६ विद्यार्थ्यांचा चौथ्या तर ३८४ विद्यार्थ्यांना पाचव्या पसंतीचे महाविद्यालय अलॉट झाले आहे. ५४६ विद्यार्थी सहाव्या पसंतीक्रमाच्या पुढे आहेत. दुसºया गुणवत्ता यादीतील ६६४२ विद्यार्थ्यांपैकी कला शाखेत ८१७, वाणिज्य शाखेसाठी २७२०, विज्ञान शाखेसाठी ३०३५ तर व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी ७० विद्यार्थ्यांना दुसºया गुणवत्ता यादीत स्थान मिळाले आहे.
दुसºया गुणवत्ता यादीत राज्य मंडळाबरोबरच अन्य सहा बोर्डांमधून दहावी उत्तीर्ण केलेल्या विद्यार्थ्यांचादेखील समावेश आहे. यामध्ये सर्वाधिक विद्यार्थी ६२७४ इतके हे राज्य परीक्षा मंडलातील आहेत. सीबीएसईचे १७८, आयसीएसईचे १४९, आयजीजीएसईचे ८ तर ३२ विद्यार्थी हे अन्य बोर्डातून उत्तीर्ण झालेले विद्यार्थी आहेत.
४०५५ विद्यार्थी बसलेत अडून
दुसºया गुणवत्ता यादीत पहिल्या पसंतीचे महाविद्यालय मिळालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी मिळालेली असून पहिल्या यादीतील काही विद्यार्थ्यांनीदेखील अकरावीत प्रवेश निश्चित केलेला आहे.
पसंतीक्रमानुसार प्राप्त महाविद्यालयात विद्यार्थ्यांना गुणवत्तेनुसार आॅनलाइन प्रवेश मिळत असले तरी काही विद्यार्थी असे आहेत की त्यांना ठराविक महाविद्यालयातच प्रवेश हवा असून, केवळ एकच महाविद्यालयात नोंदलेल्या विद्यार्थ्यांची संख्या ४०५५ इतकी आहे.
कनिष्ठ महाविद्यालयाचे कटआॅफ (दुसरी यादी)
कनिष्ठ महाविद्यालयाचे नाव शाखा कटआॅफ
भोसला मिलिटरी महाविद्यालय सायन्स ८१.८०
बीवायके कॉलेज आॅफ वाणिज्य वाणिज्य ८४.४०
बिटको, नाशिकरोड वाणिज्य ७५.८०
बिटको महाविद्यालय, नाशिकरोड सायन्स ७९.८०
एचपीटी कला अ‍ॅण्ड आरवायके विज्ञान ज्यू. कॉलेज कला ६०.८०
एचपीटी कला अ‍ॅण्ड आरवायके विज्ञान ज्यू. कॉलेज सायन्स ८९.४०
केएसकेडब्ल्यू कला, सायन्स व वाणिज्य कॉलेज, सिडको सायन्स ८१.२०
केटीएचएम महाविद्यालय, गंगापूररोड वाणिज्य ८०.६०
केटीएचएम महाविद्यालय, गंगापूररोड सायन्स ८५.२०
केव्हीएन नाईक, कॅनडा कॉर्नर सायन्स ८५.८०
एलव्हीएच पंचवटी महाविद्यालय सायन्स ७७.४०
एचपीटी कला अ‍ॅण्ड आरवायके विज्ञान ज्यू. कॉलेज सायन्स ८९.४०

Web Title: Second quality list released

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.