शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

सलग दुसऱ्या दिवशी कोरोनाबाधित हजारपार !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2022 01:49 IST

जिल्ह्यात कोरोनाबाधितांच्या संख्येने रविवारी (दि.९) पुन्हा कोरोनाबाधितांच्या संख्येने हजाराचा आकडा ओलांडला असून, तब्बल १०५६ बाधित आढळून आले आहेत. दरम्यान, बाधित हजारपार असूनही सलग तिसऱ्या दिवशी बळीदेखील शून्य असल्याचा अल्पसा दिलासा प्रशासनासह आरोग्य विभागाला आहे.

नाशिक : जिल्ह्यात कोरोनाबाधितांच्या संख्येने रविवारी (दि.९) पुन्हा कोरोनाबाधितांच्या संख्येने हजाराचा आकडा ओलांडला असून, तब्बल १०५६ बाधित आढळून आले आहेत. दरम्यान, बाधित हजारपार असूनही सलग तिसऱ्या दिवशी बळीदेखील शून्य असल्याचा अल्पसा दिलासा प्रशासनासह आरोग्य विभागाला आहे.

जिल्ह्यात रविवारी बाधित आढळून आलेल्या १०५६ रुग्णांपैकी ८२२ बाधित नाशिक मनपा क्षेत्रातील, १६९ नाशिक ग्रामीणचे, मालेगाव मनपा ४, तर जिल्हाबाह्य ६१ असे रुग्ण बाधित आहेत. दरम्यान, जिल्ह्यातील कोरोना उपचारार्थी रुग्णांची संख्या साडेचार हजारांनजीक ४,४६५वर पोहोचली आहे. त्यात नाशिक मनपा क्षेत्रातील तब्बल ३४५९ रुग्ण, नाशिक ग्रामीणचे ८२२, मालेगाव मनपाचे २७, तर जिल्हाबाह्य १५७ रुग्णांचा समावेश आहे. दरम्यान, कोरोनामुक्ततेचे प्रमाणदेखील ९७ टक्क्यांच्या खाली घसरून ९६.८४ टक्के झाले आहे. त्यात नाशिक मनपा क्षेत्रात ९६.८४, नाशिक ग्रामीण ९६.८१, मालेगाव मनपा ९६.९८, तर जिल्हाबाह्य ९५.५० टक्के इतके प्रमाण आहे. दरम्यान, जिल्ह्यातील प्रलंबित अहवालांची संख्यादेखील २२५८वर पोहोचली आहे. त्यात नाशिक ग्रामीणचे १५६४, नाशिक मनपा ६८१, मालेगाव मनपा १३, असे अहवाल प्रलंबित आहेत.

इन्फो

सलग तिसऱ्या दिवशी बळी शून्य

जिल्ह्यात ७ जानेवारीला बाधित ८३७ असताना तसेच ८ जानेवारीला बाधित ११०३ वर पोहोचले असताना आणि त्यानंतर रविवारच्या दिवशी बाधित तब्बल १०५६ असतानाही बळींची संख्या शून्य राहिल्याने एकूण बळींची संख्या ८७६३ वर कायम आहे. कोरोनाबाधित हजाराच्या पटीत वाढत असले तरी बळी मात्र शून्य असल्याचा दिलासा जिल्हा प्रशासनासह आरोग्य यंत्रणेलादेखील मिळत आहे. त्यामुळे आता सध्या तरी बाधित वाढ रोखण्याचेच त्यांचे उद्दिष्ट आहे.

टॅग्स :Nashikनाशिकcorona virusकोरोना वायरस बातम्या