शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ बाधिताच्या घराजवळील परिसर सील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2020 02:08 IST

शहरातील म्हसरूळ परिसरातील किशोर सूर्यवंशी मार्गावरील एक युवक कोरोनाबाधित असल्याचे आढळल्यानंतर महापालिकेने त्या बाधिताच्या घरापासूनचा शंभर मीटर भाग सील केला आहे. या बाधिताच्या संपर्कातील पाच जणांना डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. बाधितासह पाच जणांचे घशातील स्राव नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत.

ठळक मुद्देपाच जण रुग्णालयात : मनपाकडून परिसरातील घर सर्वेक्षण सुरू

नाशिक : शहरातील म्हसरूळ परिसरातील किशोर सूर्यवंशी मार्गावरील एक युवक कोरोनाबाधित असल्याचे आढळल्यानंतर महापालिकेने त्या बाधिताच्या घरापासूनचा शंभर मीटर भाग सील केला आहे. या बाधिताच्या संपर्कातील पाच जणांना डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. बाधितासह पाच जणांचे घशातील स्राव नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत.शहरात यापूर्वी दहा बाधित रुग्ण आढळले होते. त्यातील गोविंदनगर येथील कोरोनाबाधित पूर्णत: बरा झाल्याने त्याला घरी सोडण्यात आले आहे. आणखी दोन बाधितांचे आता तपासणी अहवाल निगेटिव्ह आल्याने त्यांना डिस्चार्ज दिला जाणार असल्याचे महापालिकेच्या वतीने सांगण्यात येत असताना आता म्हसरूळ येथे आणखी एका बाधितामुळे महापालिकेची डोकेदुखी वाढली आहे. रविवारी (दि.२६) त्याचा अहवाल पॉझिटिव्ह असल्याचा अहवाल प्राप्त झाला. सदरचा बाधित हा मूळचा सुरगाणा तालुक्यातील असला तरी सध्या तो म्हसरूळ परिसरात वास्तव्यास होता. मात्र, असे असले तरी फक्त रात्रीच तो घरी जात असे आणि दिवसभर त्याच्या कामकाजासाठी बाहेर असल्याने परिसरात जवळपास संपर्क नव्हताच. तरीही महापालिकेने जोखीम न पत्कारता सोमवारी (दि.२७) त्याठिकाणी शंभर मीटर परिसराचा भाग सील केला आहे. तसेच या भागातील रहिवाशांची तपासणी सुरू केली आहे.बाधितांची संख्या पोहोचली दहावरबाधित रुग्णाच्या अति निकटच्या संपर्कातील पाच नागरिकांना डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, असे महापालिकेच्या सूत्रांनी सांगितले. शहरात या एका रुग्णामुळे बाधितांची संख्या १० झाली आहे.४यापूर्वी गोविंदनगर, धोंडगे मळा, आनंदवली, बजरंगवाडी (समाज कल्याण विभागाचे वसतिगृह), संजीवनगर याठिकाणचे रुग्ण दाखल आहेत. मानखुर्दवरून नाशिक शहरातून जाणाऱ्या एका सुरक्षा कर्मचाºयालादेखील लागण झाली आहे.अमर्यादकालावधीसाठी सीलम्हसरूळ जवळील किशोर सूर्यवंशी मार्ग येथे आढळलेल्या नव्या कोरोनाबाधित युवकामुळे महापालिका आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी पुढील आदेश देईपर्यंत हा परिसर सील केल्याचे नमूद केले आहे. या प्रतिबंधित क्षेत्रातील कोणीही व्यक्ती घर सोडून या क्षेत्राबाहेर जाऊ शकणार नाही किंवा बाहेरील व्यक्ती या क्षेत्रात प्रवेश करू शकणार नाही. या आदेशाचा भंग केल्यास साथरोग प्रतिबंधक कायद्यानुसार संबंधित नागरिकांवर कारवाई करण्यात येईल, असे आयुक्तांनी आदेशात नमूद केले आहे.४दुपारनंतर म्हसरूळ परिसरातील अंतर्गत रस्ते बंद करण्यास प्रारंभ करण्यात आला. पोलिसांनी नागरिकांना विनंती करीत घराबाहेर न पडण्याचा सल्ला दिला.

टॅग्स :nashik collector officeनाशिक जिल्हाधिकारी कार्यालयHealthआरोग्यcorona virusकोरोना वायरस बातम्या