नाशिक : घरी येऊन भांडण का केले याचा जाब विचारला म्हणून राग आल्याने बळजबरीने घरात प्रवेश करत एका महिलेसह तृतीयपंथीयावर कोयत्याने सपासप वार करून तृतीयपंथीयाचा डावा हात मनगटापासून कापल्याची धक्कादायक घटना पंचवटीच्या फुलेनगर भागात घडली. याप्रकरणी पोलिसांनी संशयित कोयताधारी हल्लेखोर हेमंत बाबुराव बागुल (२६,रा.वैशालीनगर) यास अटक केली आहे.पंचवटी पोलीस ठाणे हद्दीतील वैशालीनगर भागात राहणाऱ्या फिर्यादी पिडित महिलेच्या घरी संशयित बागुल पाठीला कोयता लावून सोमवारी (दि.१०) मध्यरात्री आला. यावेळी त्याने जुन्या भांडणाची कुरापत काढून फिर्यादी महिलेसोबत वाद घालण्यास सुरुवात केली. यावेळी महिलेने त्यास भांडण का केले? असा जाब विचारला असता संशयिताने पाठीला लावलेला कोयता काढून तीच्या अंगावर वार केला. यावेळी महिलेची मैत्रिण असलेली तृतीयपंथीयाने तिला वाचविण्यासाठी धाव घेतली असता संशयिताने तृतीयपंथीयाच्या हातावर कोयत्याने वार केला. यामध्ये मनगटापासून तिचा डाव्या हाताचा पंजा कापला गेला. या धक्कादायक घटनेनंतर संशयिताने महिलेच्याही अंगावर वार करुन तीलाही जखमी करत घरातून पळ काढला. घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त अमोल तांबे यांच्यासह वरिष्ठ पोलीस निरिक्षक अशोक भगत, सहायक निरिक्षक एस.जी.डंबाळे या अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली. दोघा जखमींना तातडीने रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले. याप्रकरणी फिर्यादी पिडित २२वर्षीय युवतीच्या तक्रारीवरुन पंचवटी पोलिसांनी संशयित कोयताधारी बागुल यास अटक केलीे असून त्याच्याविरुध्द खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.प्रेमसंबंधाच्या संशयातून हल्लाफिर्यादी पिडित युवतीसोबत तृतीयपंथीयाचे प्रेमसंबंध असल्याच्या संशयावरुन संशयित बागुल हा वारंवार फिर्यादी महिलेच्या घरी जाऊन वाद घालत होता. या वादाचे पर्यावसन सोमवारी मध्यरात्री हाणामारीत झाले. यावेळी संशयित बागुल याने 'तुमची कटकटच मिटवितो...' असे म्हणत कोयत्याने हल्ला चढविला. या हल्ल्याच तृतीयपंथीयाचा डावा पंजा तुटला तसेच डोक्यावरही कोयता मारल्याने गंभीर दुखापत झाली. तर महिलेच्या डाव्या पायावर वार करुन गंभीररित्या जखमी केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
धक्कादायक : 'तुमची कटकटच मिटवितो...' असे म्हणत कोयत्याने तृतीयपंथीयाचा हात मनगटातून कापला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2021 17:49 IST
महिलेची मैत्रिण असलेली तृतीयपंथीयाने तिला वाचविण्यासाठी धाव घेतली असता संशयिताने तृतीयपंथीयाच्या हातावर कोयत्याने वार केला. यामध्ये मनगटापासून तिचा डाव्या हाताचा पंजा कापला गेला.
धक्कादायक : 'तुमची कटकटच मिटवितो...' असे म्हणत कोयत्याने तृतीयपंथीयाचा हात मनगटातून कापला
ठळक मुद्देबळजबरीने घरात शिरुन कोयत्याने केले वारप्रेमसंबंधाच्या संशयातून हल्ला