शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

पेपर तपासण्यासोबत निवडणुकीच्या जबाबदारीने निकाल लांबतील ;शिक्षक महासंघाचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2019 13:55 IST

राज्याच्या  माध्यमिक व उच्चमाध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात येत असलेल्या दहावी व बारावीच्या परीक्षांच्या उत्तरपत्रिका तपासणीची प्रक्रिया सुरू झाली आहे. परंतु, पेपर तपासणीचे काम सुरु असतानाच शिक्षकांवर लोकसभा निवडणुकीच्या विविध कांमाची जबाबदारी सोपविली जात आहे. त्यामुळे पेपर तपासणीच्या कामाला विलंब होऊन दहावी व बारावीचे निकालही लांबतील असा इशारा देताना निवडणूक प्रक्रियाच्या कामातून परीक्षेची जबाबदारी असलेल्या कनिष्ठ महाविद्यालयीन व माध्यमिक शिक्षकांना वगळण्याची मागणी कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाने केली आहे. 

ठळक मुद्दे कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांना प्रक्रियेतून वगळण्याची मागणी शिक्षककांवर दहावी बारावी परीक्षांचे पेपर तपासण्याची जबाबदारीनिवडणुकीच्या कामामुळे दहावी बारावीचे निकाल लांबतील

नाशिक : राज्याच्या  माध्यमिक व उच्चमाध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात येत असलेल्या दहावी व बारावीच्या परीक्षांच्या उत्तरपत्रिका तपासणीची प्रक्रिया सुरू झाली आहे. परंतु, पेपर तपासणीचे काम सुरु असतानाच शिक्षकांवर लोकसभा निवडणुकीच्या विविध कांमाची जबाबदारी सोपविली जात आहे. त्यामुळे पेपर तपासणीच्या कामाला विलंब होऊन दहावी व बारावीचे निकालही लांबतील असा इशारा देताना निवडणूक प्रक्रियाच्या कामातून परीक्षेची जबाबदारी असलेल्या कनिष्ठ महाविद्यालयीन व माध्यमिक शिक्षकांना वगळण्याची मागणी कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाने केली आहे. निवडणुकीच्या कामात शिक्षक-प्राध्यापकांना गुंतवल्यामुळे निकाल उशीरा लागण्याची शक्यता व्यक्त करतानाच विद्यार्थ्यांचे मुल्यमापण प्रक्रियेत व्यस्त असलेले जिल्ह्यातील ३ हजार प्राध्यापक-शिक्षकांना निवडणूक कामांतून वगळण्याची मागणी केली जात आहे. या मागणीसाठी निवडणूक आयोग, राज्य सरकारला निवेदन देणार असल्याचे कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी सांगीतले. यापूर्वी शिक्षकांनी केलेल्या असहकार आंदोलनामुळे उत्तरपत्रिका तपासणी, मुल्यमापणाच्या कामास यंदा आठ दिवस उशीराने सुरुवात झाली आहे. इकीकडे बारावीच्या परीक्षा सुरू असतांना निकाल वेळेवर लागावा, यासाठी तपासणी व मुल्यमापण प्रक्रियेला गती दिली जाते आहे. असे असताना गेल्या काही दिवसांपासून सुरू झालेल्या दहावीच्या परीक्षेचेही पेपर तपासण्याचे काम सुरू झालेले आहे. त्यामुळे या कामात बहूतांश शिक्षक व्यस्त असून उर्वरित शिक्षकांवर दहावी -बारावीच्या परीक्षा संपतात अकरावीच्या परीक्षा व प्रवेश प्रक्रियेचे काम लागणार आहे.अशा स्थितीत लोकसभा निवडणुक कामांमध्ये प्राध्यापक, शिक्षक अडकले तर मुल्यमापण प्रक्रियेवर परिणाम होऊन निकाल जाहीर होण्यास विलंब होईल, असा इशारा कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाने विभागीय शिक्षण मंडळासह निवडणूक प्रशासनाला दिला आहे. त्यामुळे निवडणुक प्रक्रियेतील शिक्षकांवरील जबाबदारीविषीय प्रशासन नेमकी काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहेआठ दिवस उशीराने सुरुवात शिक्षकांनी पुकारलेल्या असहकार आंदोलनामुळे यंदा बारावीचे पेपर तपासणीला आठ दिवस उशीराने सुरुवात झाली आहे. जिल्ह्यातील जवळपास ३ हजार शिक्षण पेपर तपासणीचे काम करत आहे. बारावीचे पेपर तपासणी सुरू असतांनाच अकरावीची परिक्षा घेऊन त्यांचाही निकाल जाहिर करावा लागणार आहे. तर दहावीची परीक्षा संपताच अकरावीची प्रवेश प्रक्रियाही सुरू होते. अशावेळी शिक्षकांना मतदान प्रक्रियेचे काम दिल्यास बारावीचे पेपर तपासणी आणि निकालावर परिणाम होऊन निकाल लांबू शकतात.-प्रा. संजय शिंदे, सरचिटणीस, राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघ.

 

टॅग्स :Electionनिवडणूकexamपरीक्षाStudentविद्यार्थीTeacherशिक्षकcollegeमहाविद्यालय