शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
4
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
5
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
6
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
7
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
8
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
9
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
10
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
11
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
12
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
13
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
14
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
15
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
16
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
17
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
18
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
19
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
20
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
Daily Top 2Weekly Top 5

भंगार व्यवसायिकाने घडविले माणूसकीचे दर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2019 15:08 IST

लासलगाव : ग्रामीण भागाचा आत्मा असलेल्या टपाल कार्यालयाचा बेजबाबदार कारभार पुनश्च एकदा निदर्शनास आला आहे. दैनंदिन कामकाज करु न कुटुंबाचा गाडा हाकणारे गोरगरीब जनता उन्हातान्हाची पर्वा न करता आधार केंद्रावर रांगेत उभे राहुन आधार कार्ड काढलेत. आणि टपाल कार्यालयाने आलेले शेकडो आधारकार्ड जनतेला घरी न पोहचविता रद्दीत फेकले. परंतु रद्दीवाल्याने हेच शेकडो आधारकार्ड लाभार्थ्यांपर्यंत पोहचवित माणूसकीचे दर्शन घडविले आहे.

लासलगाव : ग्रामीण भागाचा आत्मा असलेल्या टपाल कार्यालयाचा बेजबाबदार कारभार पुनश्च एकदा निदर्शनास आला आहे. दैनंदिन कामकाज करु न कुटुंबाचा गाडा हाकणारे गोरगरीब जनता उन्हातान्हाची पर्वा न करता आधार केंद्रावर रांगेत उभे राहुन आधार कार्ड काढलेत. आणि टपाल कार्यालयाने आलेले शेकडो आधारकार्ड जनतेला घरी न पोहचविता रद्दीत फेकले. परंतु रद्दीवाल्याने हेच शेकडो आधारकार्ड लाभार्थ्यांपर्यंत पोहचवित माणूसकीचे दर्शन घडविले आहे. अतिक शेख यांनी गरिबीतुन तोडक्या पैशावर भंगार व्यवसाय सुरु केलेला आहे. अतिक शेख व राकेश शेजवळ, उमेश शेजवळ यांनी माणूसकी दाखवत ओळखीतल्या नागरिकांना फोन करु न आधारकार्ड वाटप सुरु केलेले आहे. ज्यांची ओळख पटली नाही ते आधारकार्ड त्यांनी ग्रामपंचायत कार्यालयातील कर्मचारी बाबासाहेब गिते यांच्याकडे सुपूर्द केले. गिते यांनी सर्व लाभार्थ्यांची यादी तयार करु न सोशल मिडीयावर प्रसिध्द करु न आधार कार्डबाबत कळविले.वास्तविक पोस्टमास्तर यांनी सदरचे आधारकार्ड हे लाभार्थ्यांना घरपोहच देणे गरजेचे होते. पण सदरचे आधारकार्ड गलथान कामकाजामुळे लाभार्थ्यांऐवजी पोहचले भंगारवाल्याकडे. गोरगरीब जनतेने कामधंदा बुडवुन आधारकार्ड काढलेत. पुन्हा आधारकार्डची आॅनलाईन प्रिंट काढण्यासाठीही आर्थिक भार सोसावा लागलेला आहे. आधारकार्डची सर्वत्र गरज लागत असल्याने लाभार्थी वैतागून गेलेला आहे. त्यामुळे संबंधितांची चौकशी होवून त्यांच्यावर कडक कारवाई व्हावी अशी नागरिकांची ईच्छा आहे.

टॅग्स :Nashikनाशिक