शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

बंदूकीतून सुटलेल्या छ-र्याने शाळकरी नेमबाज जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2019 21:40 IST

नाशिक : एअर गन शुटींगचा सराव करताना अचानकपणे बंदूकीतून सुटलेली गोळी (छर्रा) टार्गेटवरून पुन्हा माघारी येऊन युवा नेमबाज प्रसाद ...

ठळक मुद्देस्पर्धांमध्ये सुवर्णपदकही पटकाविले

नाशिक : एअर गन शुटींगचा सराव करताना अचानकपणे बंदूकीतून सुटलेली गोळी (छर्रा) टार्गेटवरून पुन्हा माघारी येऊन युवा नेमबाज प्रसाद देवीदास बैरागीच्या (१४,रा.निफाड) छातीला लागल्याने तो जखमी झाला; मात्र तत्काळ जिल्हा रूग्णालयात त्यास दाखल करण्यात आल्याने सुदैवाने अनर्थ टळला असून जिल्हा रूग्णालयातील अतिदक्षता विभागात त्याच्यावर उपचार सुरू आहेत.नेवासा येथील सैनिकी शाळेत प्रसाद शिकत असून त्याने आठवीची परिक्षा उत्तीर्ण केली आहे. मागील वर्षभरापासून तो एअर गन शुटींग स्पर्धेत सहभागी होत आहे. त्याने जिल्हा, विभागीय स्तरावर झालेल्या स्पर्धांमध्ये सुवर्णपदकही पटकाविले आहे. नुकत्याच राज्य असोसिएशनच्या मुंबई येथे होणाऱ्या स्पर्धेसाठी त्याची निवड झाल्याचे समजते. उन्हाळी सुटी असल्यामुळे प्रसाद मुळ गावी निफाडला घरी आला आहे. गुरूवारी (दि.६) सायंकाळी नेहमीप्रमाणे तो शुटींगचा सराव करत होता. यावेळी बंदूकीतून सुटलेली छर्रा समोरील अडथळ्यावर आदळून पुन्हा माघारी फिरल्याने प्रसादच्या छातीला येऊन लागली. अतिरीक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निखील सैंदाणे, वैद्यकीय अधिकारी डॉ. गायधनी यांनी प्रसादवर तत्काळ उपचार सुरु केले. प्रसादची प्रकृती स्थिर असून जास्त गंभीर प्रकार नसल्याचे सैंदाणे म्हणाले.

टॅग्स :NashikनाशिकShootingगोळीबारAccidentअपघात