शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामपंचायतींच्या मदतीने जुलैपासून शाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2020 23:25 IST

नाशिक : गावातील स्थानिक कोविड प्रतिबंध समितीच्या सल्ल्याने कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव नसलेल्या ग्रामीण भागातील शाळा जुलैपासून सुरू करण्यासंदर्भात नियोजन करण्याच्या सूचना माध्यमिक शिक्षणाधिकारी प्रवीण पाटील यांनी मुख्याध्यापक संघाच्या आॅनलाइन बैठकीत गुरुवारी (दि.१८) केल्या. त्यासाठी स्थानिक ग्रामपंचायत, शाळा व्यवस्थापन समिती व शिक्षक पालक संघटनेच्या मदती घेण्याचा सल्लाही त्यांनी मुख्याध्यापकांना केल्या आहेत.

ठळक मुद्देशिक्षणाधिकाऱ्यांच्या सूचना : एसएमसी, पीटीएचीही मदत घेण्याचा सल्ला

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : गावातील स्थानिक कोविड प्रतिबंध समितीच्या सल्ल्याने कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव नसलेल्या ग्रामीण भागातील शाळा जुलैपासून सुरू करण्यासंदर्भात नियोजन करण्याच्या सूचना माध्यमिक शिक्षणाधिकारी प्रवीण पाटील यांनी मुख्याध्यापक संघाच्या आॅनलाइन बैठकीत गुरुवारी (दि.१८) केल्या. त्यासाठी स्थानिक ग्रामपंचायत, शाळा व्यवस्थापन समिती व शिक्षक पालक संघटनेच्या मदती घेण्याचा सल्लाही त्यांनी मुख्याध्यापकांना केल्या आहेत.शासनाच्या आदेशानुसार शाळा सुरू करण्यासाठी सुरुवातीला शाळा व्यवस्थापन समित्यांची सभा घेऊन गावांमधील कोविड प्रतिबंध समिती तसेच स्थानिक पदाधिकारी यांच्याशी चर्चा करून शाळा सुरू करण्यासंदर्भातील नियोजन करण्याच्या सूचना शिक्षणाधिकाऱ्यांनी केल्या. परंतु, स्थानिक पदाधिकारी व ग्रामपंचायतींकडून शाळा सुरू करण्यासाठी आवश्यक साहित्याचा पुरवठा करण्यास व इतर सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यात सहकार्य होत नसल्याची तक्रार मुख्याध्यापकांनी केली. शाळांमध्ये स्वच्छता, निर्जंतुकीकरण, पाण्याची सोय आदी करण्यासाठी स्थानिक ग्रामपंचायतींचे सहकार्य घेऊन शाळा सुरू करण्याचा सल्ला शासनस्तरावरून देण्यात आला आहे.दरम्यान, रेड झोनमध्ये नसलेल्या नववी, दहावी व बारावीच्या शाळा-कॉलेज जुलैपासून, ६ वी ते ८ वी आॅगस्टपासून, वर्ग ३ ते ५ सप्टेंबरपासून, वर्ग १ ते २ री शाळा व्यवस्थापन समितीच्या मान्यतेने सुरू करण्याच्या सूचना शासनाने केल्या आहेत, तर अकरावीचे वर्ग दहावीच्या निकालानंतर सुरू करण्याचे नियोजन आहे. दिवसाआड शाळा सुरू करण्याचे नियोजनशिक्षणाधिकाºयांनी ग्रामपंचायतींचे सहकार्य मिळवून देण्याविषयी आश्वस्त करण्यात आल्यानंतर मुख्याध्यापकांनी विद्यार्थ्यांना दोन गटांत विभागून दिवसाआड शाळा सुरू करण्याचे नियोजन केले. यात सोमवार, बुधवार व शुक्रवार असे तीन दिवस एक गटाचे वर्ग, तर मंगळवार, गुरुवार व शनिवारी दुसºया गटांचे वर्ग असे एक दिवसआड शाळा सुरू करण्याविषयी चर्चा झाल्याची माहिती मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष एस. के. सावंत यांनी दिली.

टॅग्स :Educationशिक्षणSchoolशाळा