शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
2
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
3
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
4
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
5
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
6
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
7
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
8
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
9
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
10
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
11
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
12
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
13
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
14
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
15
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
16
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
17
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
18
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
19
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
20
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द

प्रीतिसुधाजी शिक्षण फंडकडून शिष्यवृत्ती, शैक्षणिक पुरस्कार प्रदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2018 15:36 IST

याप्रसंगी पाटील म्हणाले, आरक्षणाच्या मागणीसाठी रस्त्यावर मोर्चे, आंदोलने केली जात आहे, ते केवळ समाजाच्या प्रगतीसाठी. एकूणच वाढती लोकसंख्या, नोक-यांचे घटते प्रमाण आणि सुशिक्षित बेरोजगारांची वाढती संख्या यामुळे संघर्ष निर्माण होताना दिसत आहे. शालेय शिक्षणपद्धतीपासून काळानुरूप बदल गरजेचे आहे.

ठळक मुद्दे २७ विद्यार्थ्यांना विशेष शैक्षणिक पुरस्कार प्रदान

नाशिक : समाज सुशिक्षित जरी होत असला तरी बेरोजगारी अधिक वाढत आहे. कारण आपल्या शिक्षणपद्धतीमध्ये काळानुरूप बदल अद्याप होत नसून केवळ पदव्यांचे कागद घेऊन सुशिक्षित तरुण नोकऱ्यांचा शोध घेताना दिसतात; कौशल्याधिष्ठित शिक्षणपद्धतीद्वारे बेरोजगारीवर मात करणे शक्य आहे, असे प्रतिपादन सातारा येथील रयत शिक्षण संस्थेचे डॉ. अनिल पाटील (जैन) यांनी केले.जैन श्वेतांबर स्थानकवासी श्री संघ नाशिक संचलित प.पू. श्री प्रीतिसुधाजी शिक्षण फंड संस्थेच्या वतीने रविवारी (दि.५) परशुराम सायखेडकर नाट्यगृहात शिष्यवृत्ती, शैक्षणिक व कौशल्य पुरस्काराचे वितरण करण्यात आले. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून पाटील बोलत होते. यावेळी व्यासपीठावर अध्यक्षसस्थानी मनीष सोनमिंढे, उद्योजक दिनेशकुमार कुवाड, प्रितीसुधाजी शिक्षण फंडचे अध्यक्ष मोहनलाल लोढा, संघपती राजमल भंडारी, विजय बेदमुथा, जवहरीलाल भंडारी, शांतीलाल हिरण, दत्तात्रय बच्छाव, डॉ. प्रदीप भंडारी, आशिष भन्साळी, लताबाई लोढा, प्रमीला पारख आदि मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी पाटील म्हणाले, आरक्षणाच्या मागणीसाठी रस्त्यावर मोर्चे, आंदोलने केली जात आहे, ते केवळ समाजाच्या प्रगतीसाठी. एकूणच वाढती लोकसंख्या, नोक-यांचे घटते प्रमाण आणि सुशिक्षित बेरोजगारांची वाढती संख्या यामुळे संघर्ष निर्माण होताना दिसत आहे. शालेय शिक्षणपद्धतीपासून काळानुरूप बदल गरजेचे आहे. कौशल्य ज्यांच्याकडे आहे, तेच प्रगती करू शकतात त्यामुळे कौशल्याधिष्ठित शिक्षणाला महत्त्व प्राप्त झाल्याचे त्यांनी सांगितले. तसेच सोनमिंढे यांनीही उपस्थित पुरस्कारार्थी व गुणवंत विद्यार्थ्यांना भावी वाटचालीस शुभेच्छा देत आयुष्यात येणाºया संकटांवर आपल्या इच्छाशक्ती जिद्दीच्या बळावर मात करावी, असे आवाहन केले. दरम्यान, पाटील यांना शिक्षणक्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल डॉ. कन्हैयालाल बलदोटा परिवाराच्या वतीने दिल्या जाणा-या ‘कौशल्य पुरस्कार’ने गौरविण्यात आले. ११ हजार रोख, स्मृतिचिन्ह व सन्मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप होते. तसेच २७ विद्यार्थ्यांना विशेष शैक्षणिक पुरस्कार प्रदान करण्यात आले. तसेच दहावी व बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांनाही गौरविण्यात आले. दरम्यान, यावेळी समाजातील गरजुंना शिक्षणासाठी हातभार लागावा, याकरिता फंडच्या माध्यमातून सुमारे आठ लाखांची शिष्यवृत्ती प्रदान करण्यात आली. प्रास्तविक अ‍ॅड. विद्युलता तातेड यांनी केले. सूत्रसंचालन, सतीश कोठारी, प्रा.लोकेश पारख यांनी केले.

 

 

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्रNashikनाशिक