शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

सयाजीराव गायकवाड ‘भारतरत्न’चे हक्कदार- राजमाता शुभांगिनीराजे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2021 06:02 IST

मराठी साहित्य संमेलनात लोकशाहीर अण्णा भाऊ साठे सभागृहात आयोजित प्रकाशन मंचचे उद्घाटन व महाराष्ट्र शासनाच्या महाराजा गायकवाड चरित्र साधन प्रकाशन समितीच्या वतीने महाराजांवरील ५० ग्रंथांचे प्रकाशन शुभांगिनीराजे गायकवाड यांच्या हस्ते झाले.

धनंजय वाखारेनाशिक : महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना घडविणारे महाराजा सयाजीराव गायकवाड हे सुद्धा भारतरत्नचे हक्कदार आहेत. शासनकर्त्यांनी त्यासाठी प्रयत्न करावे, अशी अपेक्षा महाराजांच्या पणतूसून व बडोदा येथील महाराजा गायकवाड विद्यापीठाच्या कुलपती राजमाता शुभांगिनीराजे गायकवाड यांनी व्यक्त केली. 

मराठी साहित्य संमेलनात लोकशाहीर अण्णा भाऊ साठे सभागृहात आयोजित प्रकाशन मंचचे उद्घाटन व महाराष्ट्र शासनाच्या महाराजा गायकवाड चरित्र साधन प्रकाशन समितीच्या वतीने महाराजांवरील ५० ग्रंथांचे प्रकाशन शुभांगिनीराजे गायकवाड यांच्या हस्ते झाले. व्यासपीठावर संमेलनाचे स्वागताध्यक्ष व जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ, चरित्र साधन प्रकाशन समितीचे सदस्य सचिव बाबा भांड, उच्चशिक्षण संचलनालयाचे संचालक डॉ. धनराज माने उपस्थित हाेते. 

शुभांगिनीराजे गायकवाड म्हणाल्या, आधुनिक भारताच्या जडणघडणीत महाराजा सयाजीराव गायकवाड यांचे महत्त्वपूर्ण योगदान होते. ते प्रजावंत सुशासक होते. त्यांचा अनमोल वैचारिक वारसा पुढे नेण्याचे काम महाराष्ट्र सरकार करत आहे. त्यांच्या ग्रंथांमधून महाराजांची नव्याने ओळख होणार असून, हे काम राष्ट्रस्तरावरही झाले पाहिजे. नाशिक जिल्ह्याचे सुपुत्र असलेल्या महाराजांनी समाजाच्या सर्वच घटकांसाठी केलेले काम दिशादर्शक आहे. जो अनेकांचा पोशिंदा राहिला त्याचे साहित्य मात्र अनेक वर्षांपासून प्रकाशित होऊ शकले नव्हते. महाराष्ट्र सरकारने त्याबाबत घेतलेल्या पुढाकाराबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली. 

स्वागताध्यक्ष छगन भुजबळ यांनी महात्मा फुले यांचे विचार अंमलात आणणारा हा राजा होता. त्यांचा विचार पोहोचविण्याचे काम विविध माध्यमांतून केले जाईल, अशी ग्वाही दिली. समितिचे सदस्य सचिव बाबा भांड यांनी ५० ग्रंथ प्रकाशनामागची भूमिका विशद केली. 

उदय सामंत यांची ऑनलाइन उपस्थिती राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तसेच महाराजा सयाजीराव गायकवाड चरित्र साधन प्रकाशन समितीचे अध्यक्ष उदय सामंत हे विमानात बिघाड झाल्यामुळे नाशिकला पोहोचू शकले नाहीत. त्याऐवजी त्यांनी ऑनलाइन हजेरी लावत उपस्थितांशी संवाद साधला.

टॅग्स :akhil bharatiya marathi sahitya mahamandalअखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ