शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

उन्हाच्या दाहकतेपासून बचावासाठी फळबागांवर साड्यांचे आच्छादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2019 17:09 IST

सिन्नर : तालुक्यातील पूर्व भागात उन्हाची दाहकता वाढल्याने याचा परिणाम जनसामान्यांबरोबरच फळबागांवरही होऊ लागला आहे. हातातोंडाशी आलेला घास हिरावला जाऊ नये म्हणून वावी, खोपडी, कहांडळवाडीतील अनेक शेतकऱ्यांनी फळबागावर रंगीबेरंगी साड्यांचे आच्छादन टाकल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.

कडक उन्हाच्या तडाख्यापासून बचाव करण्यासाठी वावी येथील शेतकरी शंकर रसाळ, जगन रसाळ यांनी नऊशे डाळिंब झाडांना पंधराशे साड्यांचे आच्छादन टाकले आहे. एका झाडाला एक ते दीड साठी वापरली असून साड्या सिन्नर, विंंचूर, संगमनेर बाजारपेठेतून खरेदी केल्या आहेत. त्यांना या अच्छादनासाठी तेवीस हजार रूपये खर्च आला असून फळबागांचे तीव्र उन्हापासून संरक्षण करण्याचा प्रयत्न केला आहे.वावी परिसरात अके शेतकऱ्यांकडे फळबागा आहेत. त्यापैकी काही फळबागा पाण्याअभावी करपल्या, तर काही फळबागा वाचविण्यासाठी झाडांना सावली करणे, झाडांच्या खोडाजवळ पाचट टाकणे, पाणी रात्री देणे, झाडांची छाटणी करून झाडावरील बोजा कमी करणे आदी विविध उपायात्मक योजना राबवून शेतकरी फळबागा वाचविण्यासाठी धडपडत आहेत.तालुक्यात फळबागांचा पाण्याचा प्रश्न गंभीर बनल्याने अनेक फळबागा संपुष्टात आल्या आहेत. ज्या शेतक-यांनी दुष्काळी परिस्थितीवर मात करून फळबागा जगवल्या, फळबागांवर उष्णतेचा परिणाम होऊ नये म्हणून शेतक-यांनी डाळिंबाच्या झाडांवर साड्यांचे आच्छादन टाकले आहे.

टॅग्स :Sun strokeउष्माघातFarmerशेतकरी