शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
2
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
3
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
4
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
5
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
6
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
7
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
8
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
9
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
10
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
11
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
12
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
13
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
14
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
15
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
16
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
17
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
18
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
19
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
20
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द

भावाचा जीव वाचविला; पण नियतीच्या पुढे स्वत:चे प्राण हारला..!..!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2020 13:24 IST

गटारीचे पाइप टाकले जात आहे. खोदकामात महावितरणची भूमिगत वीजवाहीनी तुटल्यामुळे येथील जगताप यांच्या घराच्या आवारात वीजप्रवाह उतरल्याचे बोलले जात आहे.

ठळक मुद्देवैद्यकिय अधिकाऱ्यांनी धीरजला तपासून मयत घोषित केलेभाऊ तर होतेच; मात्र एकमेकांचे जीवलग

नाशिक : सिडको परिसरातील शिवशक्ती चौकात जगताप कुटुंब वास्तव्यास आहे. गुरुवारी (दि.२९) सकाळी नेहमीप्रमाणे नळांना दैनंदिन पाणीपुरवठा करण्यात आला. यावेळी अमोल जगताप हा पाणी भरण्यासाठी घराबाहेर आला. यावेळी अचानकपणे त्याला वीजप्रवाहचा झटका बसला आणि तो अंगणात कोसळला. ही बाब लक्षात येताच त्याच्या मदतीला भाऊ धीरज धावून आला आणि त्याने त्यास बाजूला केले मात्र याचवेळी त्यालाही वीजप्रवाहाचा जोरदार झटका लागल्याने त्याचा जागीच मृत्यु झाल्याची दुर्दैवी घटना घडल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.सिडको भागातील शिवशक्ती चौकात महापालिकेच्या भुयारी गटार योजनेचे काम सुरु आहे. यामुळे रस्त्याचे खोदकाम करण्यात आले असून गटारीचे पाइप टाकले जात आहे. खोदकामात महावितरणची भूमिगत वीजवाहीनी तुटल्यामुळे येथील जगताप यांच्या घराच्या आवारात वीजप्रवाह उतरल्याचे बोलले जात आहे. सकाळी नळाला पाणी भरण्याची लगबग सुरु असताना अमोल नानाजी जगताप हा आपल्या आईला मदतीसाठी पाणी भरण्याकरिता घराबाहेर आला. याचवेळी त्याला वीजप्रवाहाचा झटका बसल्याने तो दुरवर फेकला गेला. अमोल अचानक का कोसळला? म्हणून बघण्यासाठी त्याचा भाऊ धीरज नानाजी जगताप (२६्) हा धावला असता त्यालाही वीजप्रवाहचा धक्का बसल्याने तोही कोसळला. अचानकपणे दोघे भाऊ अंगणात कोसळल्याचे लक्षात येताच आजुबाजुच्या रहिवाशांनी धाव घेत दोघांना उचलले. यावेळी दोघांनाही जवळच्या खासगी रुग्णालयात उपचारार्थ हलविण्यात आले. धीरजची प्रकृती चिंताजनक बनल्याने त्यास जिल्हा शासकिय रुग्णालयात उपचारार्थ हलविण्यात आले; मात्र रुग्णालयात वैद्यकिय अधिकाऱ्यांनी धीरजला तपासून मयत घोषित केले. या दुर्घटनेत मोठा भाऊ अमोलचे प्राण वाचविण्यास थोरल्या धीरजला यश आले असले तरी दुर्दैवाने काळाने जगताप कटुंबियांपासून त्यास हिरावून घेतले. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. अरुंद गल्लीबोळ असल्यामुळे ठेकेदाराने या ठिकाणी जेसीबीचा वापर करत भुमीगत गटारींकरिता खोदकाम करण्याची गरज नव्हती. ठेकेदाराने या दुर्घटनेत जगताप कुटुंबाला आर्थिक मदत देणे गरजेचे आहे, अन्यथा आंदोलन करु, असे नगरसेवक सुधाकर बडगुजर यांनी सांगितले.भाऊ तर होतेच; मात्र एकमेकांचे जीवलग मित्रदोन्ही भाऊ मित्रांसारखे राहत होते. त्यांचा एकमेकांवर प्रचंड जीव होता. दोघेही मुंबईत नोकरीला असून अविवाहित आहे. लॉकडाऊनपासून ते नाशिकला आई-वडिलांकडे आले होते. दिवाळीचा सण आटोपून ते पुन्हा नोकरीसाठी मुंबईला रवाना होणार होते.

 

टॅग्स :NashikनाशिकAccidentअपघातNashik municipal corporationनाशिक महानगर पालिका