शहरं
Join us  
Trending Stories
1
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
2
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
3
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
4
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
5
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
6
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
7
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
8
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
9
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
10
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
11
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
12
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
13
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
14
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
15
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
16
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
17
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
18
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
19
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
20
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

पक्षी वाचवा अभियान : मुलांनो गलोल आणून द्या अन‌ गिफ्ट घ्या...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2021 15:29 IST

पश्चिम वन विभागातील इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, सुरगाणा, पेठ, हरसूल, ननाशी यांसारख्या आदिवासी भागांमध्ये पक्षी संवर्धनाच्यादृष्टीने लहान मुलांच्या हाती असलेल्या गलोल त्यांच्याकडून स्वयंस्फुर्तीने जमा करुन घेण्यावर भर दिला जाणार आहे.

ठळक मुद्देआदिवासी भागातील शाळकरी मुलांचे प्रबोधनआदिवासी भागांमध्ये महिनभार जागर

नाशिक : पक्षी हा निसर्गाचा महत्वाचा घटक आहे. पर्यावरण संतुलन राखण्यासाठी पक्षी महत्वाची भूमिका बजावतात. जैवविविधता वाढविणाऱ्या पक्ष्यांना अभय मिळावे आणि त्यांच्यावर ग्रामिण भागात ह्यनेमह्ण भावी पिढीकडून नेम साधला जाऊ नये, या उद्देशाने नाशिक पश्चिम वनविभागाने ह्यगलोल हटवा, पक्षी वाचवाह्ण या अभियानाला जागतिक पर्यावरण दिनाच्या औचित्यावर सुरुवात केली. अभियानांतर्गत शाळकरी मुलांचे प्रबोधन करुन त्यांना पक्ष्यांची शिकारीपासून परावृत्त करत स्वयंस्फुर्तीने गलोलचा त्याग करणाऱ्या मुलांना भेटवस्तू दिली जात आहे.निसर्ग वाढविण्यासाठी तसेच आपल्या शेतीला बहर आणण्यासाठी परागीभवनासारख्या महत्वाच्या प्रक्रियेत पक्ष्यांचाही काही वाटा असतोच.शेतपीकांसाठी हानीकारक ठरणाऱ्या विविध प्रकारच्या किटकांपासून पक्षी संरक्षण करतात. तसेच निसर्गात होणारे चांगले, वाईट बदलांचे ते संकेतही देतात एवढेच नव्हे तर ऋुतुमान बदलांचीही पुर्वसुचना पक्ष्यांकडून प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे मिळत असते, म्हणूनच पक्ष्यांना निसर्गाचा खरा दागिना असेही म्हटले जाते. पक्षी संवर्धन काळाची गरज असून जिल्ह्यातील विविध आदिवासी तालुक्यांमध्ये आजही शाळकरी मुलांकडून भटकंती करत पक्ष्यांवर गलोलीच्या सहाय्याने ह्यनेमह्ण साधला जातो. लहानवयातच शिकारीच्यादिशेने होणारी ही वाटचाल रोखण्यासाठी आणि ग्रामीण भागातील मुलांमध्ये जनजागृती करुन त्यांच्या मानसिकतेत बदल घडवून आणण्याच्या उद्देशाने वनविभागाने पेठ वनपरिक्षेत्रानूत ह्यगलोल हटवी पक्षी वाचवाह्ण हे अभियान सुरु केले आहे. उपवनसंरक्षक पंकज गर्ग, सहायक वनसंरक्षक आनंद रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली वनक्षेत्रपाल सीमा मुसळे यांच्या संकल्पनेतून हे जनप्रबोधन अभियान राबविले जात आहे. शनिवारी (दि.५) पेठ तालुक्यातील करंजाळी परिमंडळातील आड गावामध्ये अभियानाचा शुभारंभ करण्यात आला.आदिवासी भागांमध्ये महिनभार जागरपश्चिम वन विभागातील इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, सुरगाणा, पेठ, हरसूल, ननाशी यांसारख्या आदिवासी भागांमध्ये पक्षी संवर्धनाच्यादृष्टीने लहान मुलांच्या हाती असलेल्या गलोल त्यांच्याकडून स्वयंस्फुर्तीने जमा करुन घेण्यावर भर दिला जाणार आहे. वनक्षेत्रपाल वनपाल, वनरक्षक यासाठी प्रयत्नशील राहणार आहे. आपली गलोल जमा करणाऱ्या मुलाला शालेय वस्तु भेट म्हणून दिली जाणार असून महिनाभर या भागात हे अभियान राबविले जाणार असल्याचे गर्ग यांनी सांगितले.--

टॅग्स :Nashikनाशिकforest departmentवनविभागbirds sanctuaryपक्षी अभयारण्यtrimbakeshwarत्र्यंबकेश्वरenvironmentपर्यावरण