शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

सावरकरांच्या छायाचित्राचा अखेर अंदाजपत्रकात समावेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2018 18:25 IST

भाजपाकडून झाले होते विस्मरण : अंदाजपत्रकाच्या प्रतींचे उशिराने वाटप

ठळक मुद्देसत्ताधारी भाजपाच्याच एका सदस्याने याबाबतचे पत्र देऊनही स्थायी समिती सभापतींनी त्याबाबत गांभीर्याने न घेतल्याने भाजपात धावपळ उडाली होती

नाशिक - महापालिकेच्या अंदाजपत्रकात अखेर स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या छायाचित्राचा समावेश करण्यात आला आहे. सत्ताधारी भाजपाच्याच एका सदस्याने याबाबतचे पत्र देऊनही स्थायी समिती सभापतींनी त्याबाबत गांभीर्याने न घेतल्याने भाजपात धावपळ उडाली होती. अखेर, गुरूवारी (दि.२९) अंदाजपत्रकात तातडीने सावरकरांचे छायाचित्र समाविष्ट करण्यात आल्यानंतर सायंकाळी अंदाजपत्रकाच्या प्रती नगरसेवकांपर्यंत पोहोचविण्यास सुरूवात करण्यात आली,महापालिकेच्या स्थायी समितीने आयुक्तांच्या अंदाजपत्रकात ११५ कोटींची भर घातल्यानंतर ते २७ मार्चला रात्री उशिरा छपाईसाठी लेखा विभागाला पाठविले. तत्पूर्वी, दि. २६ मार्च रोजी भाजपाचेच नगरसेवक योगेश हिरे यांनी स्थायी समिती सभापतींना पत्र देत अंदाजपत्रकात सावरकरांचे छायाचित्र समाविष्ट करण्याची मागणी केली होती. परंतु, सभापतींनी त्या पत्राबाबत गांभीर्याने दाखविले नाही. अंदाजपत्रक छपाईला गेल्यानंतर भाजपाच्याच सदस्याने दिलेल्या पत्राचे स्मरण स्थायीच्या अन्य सदस्यांना झाले आणि त्यांनी अंदाजपत्रक छपाई थांबवण्यासाठी प्रयत्न केले. परंतु, लेखा विभागाने त्याबाबत असमर्थता व्यक्त करत छायाचित्र समावेशाविषयी नगरसचिव विभागाकडून अभिप्राय मागविला. नगरसचिव विभागानेही त्याबाबत महासभाच निर्णय घेऊ शकते, अशी भूमिका घेतली. अखेर, सावरकरांचे छायाचित्र स्थायी समितीऐवजी महासभेच्या अंदाजपत्रकाच्या पुस्तिकेत टाकण्याचे ठरविण्यात आले. परंतु, पुन्हा निर्णय बदलण्यात येऊन गुरुवारी (दि.२९) सकाळी अंदाजपत्रकाचे बाईडिंग होण्यापूर्वी सावरकरांच्या छायाचित्राची स्वतंत्र छपाई करुन ते पुस्तिकेत समाविष्ट करण्यात आले. त्यामुळे, अंदाजपत्रकाच्या पुस्तिकेत आता कुसुमाग्रजांबरोबरच सावरकरांचेही छायाचित्र झळकणार आहे.अंदाजपत्रकाच्या प्रतींचे वाटपसावरकरांचे छायाचित्र स्थायी समितीच्याच अंदाजपत्रकात समाविष्ट करण्याचा निर्णय घेण्यात आल्याने गुरुवारी (दि.२९) सायंकाळपर्यंत अंदाजपत्रकाच्या पुस्तिका नगरसचिव विभागापर्यंत पोहोचलेल्या नव्हत्या. संध्याकाळी उशिराने प्रती हाती पडल्यानंतर त्या नगरसेवकांच्या घरी पोहोचविण्याच्या कामाला सुरूवात करण्यात आली. येत्या ३१ मार्चला सकाळी ११.३० वाजता अंदाजपत्रकीय महासभा होणार असून त्यावेळी स्थायी समितीच्या सभापती हिमगौरी अहेर या अंदाजपत्रक सादर करणार आहेत.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाBudgetअर्थसंकल्प