शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंना जोरदार धक्का! ज्याच्यासाठी लोकसभेला काँग्रेसला नडले, त्यानेच साथ सोडली; चंद्रहार पाटलांचा रामराम  
2
Maharashtra Politics : "भाजप आणि निवडणूक आयोगाची मॅच फिक्सिंग...", नाना पटोलेंचा देवेंद्र फडणवीसांवर पलटवार
3
पाकिस्तान पुन्हा उघडा पडला! सॅटेलाईट फोटो सोबत छेडछाड केली, खोटे दावे केले
4
बीएसएनएलने आणला ऑपरेशन सिंदूर प्लॅन! रिचार्जची काही रक्कम सैन्याला देणार; ग्राहकांनाही डिस्काऊंट मिळणार...
5
चांदीचा भाव विक्रमी उच्चांकावर; आठवड्यात ८,४०० रुपयांची वाढ; ३ टक्के जीएसटीसह १,०९,२८३ रुपये
6
Bhushi Dam Incident: पोहण्याच्या मोहाने घेतला जीव, भुशी डॅममध्ये बुडून दोन तरुणांचा मृत्यू
7
इंजिनिअरिंगच्या 'त्या' विद्यार्थिनीचा खून प्रेम प्रकरणातून, पोस्टमार्टेम रिपोर्टमध्ये काय? मित्राविरुद्ध गुन्हा दाखल
8
जळगाव: लग्नाच्या वाढदिवसासाठी माहेरावरून आली अन् घरात पाय ठेवताच दिसला पतीचा मृतदेह
9
सासू-सासरे अन् पतीसह तिनं मुलांनाही सोडलं नाही! कुटुंबाला 'स्लो पॉयझन' देणाऱ्या महिलेची 'अशी' झाली पोलखोल
10
पहलगाम हल्ला : मेजर विनय नरवाल यांच्या पत्नीचा अश्लील AI व्हिडीओ व्हायरल; पिता-पूत्र ताब्यात
11
अंडरवर्ल्डमधून मोठी बातमी! लॉरेन्स गँग फुटली; गोल्डी ब्रार, रोहित गोदारा लॉरेन्सपासून वेगळे झाले
12
मुंबई: मेट्रोमोनियल साईटवर भेट, लग्नाचं स्वप्न दाखवून बलात्कार, पैसेही उकळले; आरोपीला न्यायालयाने काय दिली शिक्षा?
13
"कोरोनापेक्षाही वाईट परिस्थिती येईल...", चीनबद्दल डोनाल्ड ट्रम्प यांना तज्ज्ञांचा मोठा इशारा
14
IND vs ENG : इंग्लंडमध्ये पोहचताच टीम इंडियाचा कसून सराव; २२ वर्षांनी हा चेहरा पुन्हा संघासोबत दिसला
15
Viral Video : चोरी करायला गेला अन् पाय घसरून पडला! चोराची फजिती सीसीटीव्हीत झाली कैद
16
बिहार निवडणुकीपूर्वीच एनडीएत बंडखोरी! चिराग पासवान यांची घोषणा, सर्व २४३ जागांवर लढणार...
17
हिंसाचार, बलात्कार, स्थलांतर...मणिपूर मुद्द्यावरुन प्रियंका गांधींचा मोदी सरकारवर निशाणा
18
मायकल जॅक्सनचं स्वागत करण्यासाठी सोनाली बेंद्रेने ठेवलेली 'ही' अट, म्हणाली- "राज ठाकरेंच्या पत्नीने मला..."
19
Photo : चिनाब रेल्वे पूल कमालच! पण भारतातल्या 'या' पूलांचीही जगभरात आहे चर्चा
20
“प्रश्न निवडणूक आयोगाला विचारले, पण उत्तर भाजपाने दिले, म्हणजे मॅच फिक्सिंगवर शिकामोर्तबच”

शनिवारी आरक्षण सोडत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2016 00:23 IST

येवला नगरपालिका : इच्छुकांचे लक्ष; निवडणुकीच्या तयारीला येणार वेग

 येवला : नगरपालिकेच्या नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यात होणाऱ्या निवडणुकीसाठी राज्य निवडणूक आयोगाकडून प्रभाग रचना व आरक्षण सोडत कार्यक्रम निश्चित करण्यात आला आहे. शनिवारी (दि. २) सदस्य पदाच्या आरक्षणाची सोडत प्रांताधिकारी वासंती माळी, पालिका मुख्याधिकारी राहुल वाघ यांच्या उपस्थितीत काढली जाणार आहे. आरक्षण सोडत प्रक्रियेनंतर जिल्हाधिकारी स्तरावर हरकती व सुनावणीनंतर विभागीय आयुक्त यांच्यामार्फत १० आॅगस्टला प्रभाग रचनेस अंतिम मान्यता देण्यात येणार असल्याची माहिती पालिका सूत्रांनी दिली.शासनाच्या नव्या धोरणानुसार येवला शहरात १२ प्रभाग निश्चित झाले आहेत. द्विसदस्यीय प्रभाग पद्धतीत येवला पालिकेत १२ महिला व १२ पुरुष नगरसेवक म्हणून सन २०१६-२०२१ या कालावधीत सभागृहात दिसणार आहे. येवला पालिकेत सर्वसाधारण गटासाठी १५ जागांसाठी आठ पुरु ष व सात महिला, अनुसूचित जातीसाठी निश्चित केलेल्या दोन जागांमधून एक पुरु ष व एक महिला, अनुसूचित जमातीसाठी राखीव एकमेव जागेसाठी महिला आरक्षण आहे, तर इतर मागासवर्गीय गटातील सहा जागांसाठी तीन पुरु ष व तीन महिलांसाठी आरक्षण असणार आहे. या आरक्षण सोडतीकडे भावी नगरसेवकांचे लक्ष लागले असून, आरक्षण निश्चित झाल्यानंतर विविध पक्षांकडून उमेदवारांची चाचपणी व तयारीला वेग येणार आहे. (वार्ताहर)