शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

सातपूर, पंचवटीत प्राणघातक हल्ले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2019 00:36 IST

हॉटेलमध्ये जेवण व मद्यप्राशन केल्यानंतर रक्कम अदा केली नाही, म्हणून मित्रांकडून बिअरच्या बाटल्याने हल्ला चढविण्यात आल्याची घटना सातपूरमध्ये घडली,

नाशिक : हॉटेलमध्ये जेवण व मद्यप्राशन केल्यानंतर रक्कम अदा केली नाही, म्हणून मित्रांकडून बिअरच्या बाटल्याने हल्ला चढविण्यात आल्याची घटना सातपूरमध्ये घडली, तसेच मित्राला मारहाण केली म्हणून चार तरुणांनी रस्ता अडवून दुचाकीस्वारास लाकडी दंडुक्याने मारहाण केल्याची घटना घडल्याचे उघडकीस आले आहे. या प्रकरणी संबंधितांविरुद्ध प्राणघातक हल्ले केल्याप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.या प्रकरणी पोलिसांनी दिलेली माहिती अशी, तुषार अशोक बोरसे (१९, रा. अमृतधाम) हा युवक दुचाकीवरून मित्र प्रमोद बाळू चारोस्कर याच्याबरोबर जात असताना वनदेवी सोसायटीसमोर टकलेनगर येथे संशयित सौरभ दिलीप हिरे (१९, रा. अमरधाम वखार), चंद्रप्रकाश राजेश गढवाल (१९, रा. वृंदावननगर आडगाव), अपूर्व विनायक कटारे (२१, रा. द्वारका), अनिकेत चंद्रमोरे या चौघांनी अडवून दमबाजी करत शिवीगाळ केली. यावेळी हिरे याने स्वत:जवळ असलेला लाकडी दंडुका काढत चारोस्करच्या डोक्यात मारला. तसेच उर्वरित संशयितांनी लाथाबुक्क्यांनी बोरसे यास मारहाण करण्यास सुरुवात केली. मारहाणीत चारोस्कर व हिरे जखमी झाले असून, बोरसे याने दिलेल्या फिर्यादीवरून संशयितांविरुद्ध प्राणघातक हल्ला व शस्त्रबंदी कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयित हिरे, गढवाल, कटारे यांना पोलिसांनी अटक केली असून, चंद्रमोरे हा अद्याप फरार आहे. याप्रकरणी पुढील तपास सहायक निरीक्षक इंगोळे करीत आहेत.दुसऱ्या घटनेत सातपूर औद्योगिक वसाहतीमध्ये असलेल्या एका हॉटेलच्या परिसरात मित्रांनी एकत्र जेवण व मद्यप्राशन केल्यानंतर हॉटेलचे बिल भरण्यावरून वाद होऊन संशयित उत्तम बाबुराव (३७, रा. मुंगसरा), दीपक रोकडे (२८, रा. जेलरोड), पवन फडोळ (२८, रा. मुंगसरा) यांनी फिर्यादी संपत निवृत्ती बंदावणे यास मद्याच्या रिकाम्या बाटल्यांनी मारहाण करून जखमी केले. या प्रकरणी बंदावणे याने सातपूर पोलीस ठाण्यात संशयितांविरुद्ध तक्रार दिली असून, पोलिसांनी प्राणघातक हल्ल्याचा गुन्हा दाखल करत तिघा संशयितांना अटक केली आहे. या प्रकरणी पुढील तपास उपनिरीक्षक पाटील करीत आहेत.शहरातील वाढती गुन्हेगारी नियंत्रणात आणण्याचा विश्वास नाशिककरांना नांगरे-पाटील यांनी दिला आहे. त्यानुसार त्यांनी पोलीस आयुक्तालय हद्दीत जमावबंदी, शस्त्रबंदी आदेश लागू करत टवाळखोरांसह जुगाऱ्यांविरुद्ध बडगा उगारला आहे. तसेच ‘मिशन आॅल आउट’सारखी मोहीम पुन्हा हाती घेतली आहे. तरीदेखील शहरात हाणामारीच्या घटना घडतच आहेत.

टॅग्स :PoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी