शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

सातपूरला महादेववाडीजवळ जुगार अड्ड्यावर छापा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2018 00:21 IST

सातपूर परिसरातील महादेववाडीजवळ सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर सातपूर पोलिसांनी मंगळवारी (दि़ ३०) दुपारी छापा टाकला़ यामध्ये दोन जुगाऱ्यांना ताब्यात घेण्यात आले असून, त्यांच्याकडून रोख रक्कम व जुगाराचे साहित्य यावेळी जप्त करण्यात आले आहे़

नाशिक : सातपूर परिसरातील महादेववाडीजवळ सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर सातपूर पोलिसांनी मंगळवारी (दि़ ३०) दुपारी छापा टाकला़ यामध्ये दोन जुगाऱ्यांना ताब्यात घेण्यात आले असून, त्यांच्याकडून रोख रक्कम व जुगाराचे साहित्य यावेळी जप्त करण्यात आले आहे़  महादेववाडीतील नासर्डी पुलाखाली असलेल्या मोरी नंबर तीनच्या आडोशाला पत्त्यांवर पैसे लावून जुगार सुरू असल्याची माहिती सातपूर पोलिसांना मिळाली होती़ त्यानुसार दुपारी तीन वाजेच्या सुमारास या ठिकाणी छापा टाकला असता संशयित सुधीर गोविंदराव शिंदे (५२, रा. पिंपळगाव बहुला) व शरद विठ्ठल जाधव (४२, रा. सातपूर) हे जुगार खेळत होते़ त्यांच्याकडून जुगाराचे साहित्य व रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे़ या प्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात संशयितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़नशेत कार चालविणा-या विरोधात गुन्हामद्याच्या नशेत वेडीवाकडी कार चालविणाºया चालकाविरुद्ध गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अक्षय सुदाम हंसवाणी (वय ३०, रा. २७, होलाराम कॉलनी, शरणपूररोड, नाशिक) असे गुन्हा दाखल केलेल्या संशयिताचे नाव आहे़ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मंगळवारी (दि. ३०) दुपारी मद्य सेवन करून कार (एमएच १५, ईपी ७२७६) गंगापूर रोडवरील हॉलमार्क चौकातून भरधाव व वेडीवाकडी चालवित होते़ या प्रकरणी पोलीस शिपाई तुषार देसले यांनी फिर्याद दिली आहे़पार्किंगमधून दुचाकीची चोरीजुने नाशिकमधील शिंपी गल्लीतील रहिवासी अमित पवार यांची तीस हजार रुपये किमतीची अ‍ॅक्टिवा दुचाकी (एमएच १५, एफडी ३१३६) चोरट्यांनी शनिवारी (दि. २७) गंगापूर रोडवरील सुयोजित गार्डनच्या पार्किंगमधून चोरून नेली. या प्रकरणी दुचाकीचोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ याप्रकरणी अधिक तपास सुरू आहे.घरफोडीत सोन्याच्या दागिन्यांची चोरीहिरावाडीतील बनारसीनगरमधील रुद्रा रेसिडेन्सीतील बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी ३० हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेल्याची घटना सोमवारी  (दि़ २९) घडली़ राणी मारुती पगारे (फ्लॅट नंबर ३०४) यांच्या घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून चोरट्यांनी घरात प्रवेश केला़ तसेच घरातील कपाटातून २५ हजार रुपये किमतीची एक तोळ्याची सोन्याची पोत, ओमपान असे तीस हजार रुपयांचे दागिने चोरून नेले. या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़

टॅग्स :PoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी