बेड रिकामे अन‌् रुग्णसंख्या घटल्याने समाधान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2021 11:25 PM2021-05-20T23:25:27+5:302021-05-21T00:18:29+5:30

निफाड : येथील उपजिल्हा रुग्णालयतील कोविड केअर सेंटरमध्ये दाखल होणाऱ्या रुग्णांची संख्या खूपच कमी झाली असून, या सेंटरमध्ये बरेच बेड रिकामे राहत असल्याने सदर सेंटर बंद करून या उपजिल्हा रुग्णालयातील इतर आरोग्यसेवा तातडीने सुरू कराव्यात, असे निवेदन निफाडकरांच्या वतीने प्रांताधिकारी डॉ. अर्चना पठारे आणि निफाड उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. रोहन मोरे यांना देण्यात आले.

Satisfaction with bed emptying and declining patient numbers | बेड रिकामे अन‌् रुग्णसंख्या घटल्याने समाधान

बेड रिकामे अन‌् रुग्णसंख्या घटल्याने समाधान

Next
ठळक मुद्देदिलासा : निफाड येथील कोविड सेंटर बंद करण्याची मागणी

निफाड : येथील उपजिल्हा रुग्णालयतील कोविड केअर सेंटरमध्ये दाखल होणाऱ्या रुग्णांची संख्या खूपच कमी झाली असून, या सेंटरमध्ये बरेच बेड रिकामे राहत असल्याने सदर सेंटर बंद करून या उपजिल्हा रुग्णालयातील इतर आरोग्यसेवा तातडीने सुरू कराव्यात, असे निवेदन निफाडकरांच्या वतीने प्रांताधिकारी डॉ. अर्चना पठारे आणि निफाड उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. रोहन मोरे यांना देण्यात आले.

निफाड परिसरात कोविड रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढल्याने निफाडला कोविड सेंटर सुरू करावे, अशी मागणी निफाड व परिसरातील जनतेने केली होती. या मागणीनुसार निफाड उपजिल्हा रुग्णालय येथे कोविड केअर सेंटर सुरू करण्यात आले. आणि त्याचा लाभही बऱ्याच रुग्णांना मिळाला. परंतु कोविड सेंटर झाल्यामुळे या उपजिल्हा रुग्णालयातील गरोदर माता प्रसूतीसाठी आवश्यक त्या सर्व वैद्यकीय सुविधा, शस्त्रक्रिया, लसीकरण, दंतचिकित्सा, नेत्रचिकित्सा, एक्सरे, सर्पदंश, श्वानदंश, घात, अपघात, गंभीर दुखापती, विषबाधा उपचार, शल्य विच्छेदन आदींबाबत सुविधा बंद झाल्या.
त्यात मयताचे शवविच्छेदन करण्यासाठी पिंपळगाव बसवंत वा इतर ठिकाणी जावे लागत असे. शिवाय निफाड आणि आसपासच्या गावांतील नागरिकांना इतर आरोग्य सुविधांसाठी दूरवरच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात जावे लागत होते.

मागील आठवड्यापासून या कोविड केअर सेंटरमधील कोरोना रुग्णांची संख्या खूपच घटल्याने एकूण ४० पैकी सुमारे ३५ बेड रिकामे आहेत, त्यामुळे या सदरचे कोविड केअर सेंटर बंद करून या उपजिल्हा रुग्णालयात पूर्वी असलेल्या इतर आरोग्यसुविधा तातडीने सुरू कराव्यात त्यामुळे निफाड व परिसरातील गावातील नागरिकांना या सुविधांचा लाभ घेता येईल, असे निवेदनात म्हटले आहे.
निवेदनावर माजी नगरसेवक अनिल कुंदे, निफाड उपजिल्हा रुग्णालय रुग्ण कल्याण समितीचे सदस्य मधुकर शेलार, महेश चोरडिया, शिवसेनेचे शहरप्रमुख संजय कुंदे, माजी नगरसेवक जावेद शेख, देवदत्त कापसे, दिलीप कापसे, नंदू कापसे, भाजप युवा मोर्चाचे जिल्हा चिटणीस संजय गाजरे, रमेश जाधव, बाळासाहेब कापसे आदींच्या सह्या आहेत.

Web Title: Satisfaction with bed emptying and declining patient numbers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.