शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाममध्ये दहशतवाद्यांना केली मदत, दिला आश्रय, दोघे अटकेत, तपासातून धक्कादायक माहिती समोर
2
आतापर्यंत इस्रायली हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा जाणून थक्क व्हाल! खामेनेई सैनिकांकडूनही जोरदार प्रत्युत्तर
3
पुढच्या ५ वर्षांत इराण अणुबॉम्ब बनवेल! अमेरिकेच्या हल्ल्यानंतर औवेसी म्हणाले, "तिथले कोट्यवधी भारतीय..."
4
"अमेरिकेच्या हल्ल्यानंतरही आमचे अणुऊर्जा प्रकल्प सुरक्षित"; इराणने दिली माहिती, ट्रम्प यांचा दावा फेटाळला
5
अमेरिकेने अणुकेंद्रांवर केलेल्या हल्ल्याचा इराण कसा घेणार बदला, केवळ इस्राइललाच लक्ष्य करणार की...
6
खोट्या बातम्यांवर बसणार आळा; कर्नाटक सरकारने आणला 'फेक न्यूज' कायदा, ७ वर्षांपर्यंतची शिक्षा
7
Iran Israel Conflict Explained: युद्धाच्या आगीत तेल पेटणार, भारतावर कसा परिणाम होणार?
8
भगवे झेंडे घेऊन रस्त्यावर उतरणे म्हणजे हिंदुत्व नव्हे; नितीन गडकरींची भूमिका
9
अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराण संतापला; इस्रायलवर डागली 30 क्षेपणास्त्रे, अनेक शहरांमध्ये भीतीचे वातावरण
10
VIDEO: इराणवर हल्ले सुरुच; अमेरिकेने दिलेली लढाऊ विमाने इस्रायलने केली नष्ट
11
"जंगल का कानून..."; अणुकेंद्रांवरीर हल्ल्यानंतर, इराणचा भारतमार्गे अमेरिकेला 'मेसेज'; घेतली मोठी शपथ!
12
NEET परीक्षा का बरे होत नसेल हो नीट?
13
इस्रायल सोडा अमेरिका-युरोपलाही घाबरत नाही; पण 'या' गटासमोर इराणला झुकावेच लागते!
14
‘त्या’ बेकायदा कृत्यांमध्ये कायद्याचे रक्षकच सहभागी; वसई-विरारमधील बांधकामप्रकरणी उच्च न्यायालयाने राज्य सरकारला झापले
15
इराणच्या अणुकेंद्रांवर अमेरिकेने टाकलेले बंकर बस्टर बॉम्ब एवढे आहेत विध्वंसक, अशी आहेत त्यांची वैशिष्ट्ये
16
तीन भाषा शिकण्यासाठी खेळाच्या तासात कपात; हिंदी शिकवण्यावरुन सुप्रिया सुळेंची CM फडणवीसांकडे मागणी
17
पुढच्या आठवड्यात बाजारात १२ कंपन्यांचे IPO, १५,८०० कोटींची उलाढाल! तुमच्यासाठी 'ही' सुवर्णसंधी!
18
Maharashtra Rainfall: पश्चिम महाराष्ट्रात जोरदार पाऊस, विदर्भात अजून प्रतीक्षा
19
"इराणने आता शांततेच्या मार्गावर यावे, अन्यथा...", अणुकेंद्रांवरील हल्ल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा सक्त इशारा  
20
नोकऱ्या आल्या धोक्यात! सरकार शिक्षकांना म्हणते, ‘देता आधार, का करू अंधार’

वडांगळी येथील सतीमाता यात्रोत्सव कोरोनामुळे रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2021 00:29 IST

सिन्नर : अखिल भारतीय बंजारा समाजाचे श्रध्दास्थान असलेला तालुक्यातील वडांगळी येथील सतीमाता व सामतदादा यात्रोत्सव यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रद्द ...

ठळक मुद्दे खबरदारी: गर्दी टाळण्यासाठी प्रशासनाचा निर्णय; साध्या पद्धतीने होणार कार्यक्रम

सिन्नर : अखिल भारतीय बंजारा समाजाचे श्रध्दास्थान असलेला तालुक्यातील वडांगळी येथील सतीमाता व सामतदादा यात्रोत्सव यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रद्द करण्याचा निर्णय तहसील कार्यालयात झालेल्या बैठकीत घेण्यात आला.तहसीलदार राहुल कोताडे यांच्या अध्यक्षतेखाली वडांगळी यात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर झालेल्या बैठकीला गटविकास अधिकारी मधुकर मुरकुटे, नायब तहसीलदार दत्तात्रय जाधव, एमआयडीसी पोलीस ठाण्याचे निरीक्षक दशरथ चौधरी, वैद्यकीय अधिकारी डॉ. मोहन बच्छाव, वडांगळीचे ग्रामविकास अधिकारी पी. एस. सरोदे, सतीमाता देवस्थान संस्थानचे सचिव अशोक चव्हाण, सदस्य रमेश खुुळे, दीपक खुळे, शरद खुळे यांच्यासह महावितरण, पाटबंधारे विभाग, महसूल, आरोग्य व विविध खात्यांचे अधिकारी उपस्थित होते. या यात्रोत्सवानिमित्त मिरवणूक न काढता व दुकाने न थाटता केवळ कोरोनाचे नियम पाळून धार्मिक कार्यक्रम करण्यावर बैठकीत एकमत झाले. पोलीस प्रशासन कोरोनाच्या पार्श्वभूमीवर योग्य ती खबरदारी घेणार आहे. भाविकांनी धार्मिक कार्यक्रमांना एकाचवेळी गर्दी न करता, कोरोनाचे नियम पाळून दर्शन घेण्यासह धार्मिक कार्यक्रम करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.दोडी व मऱ्हळ यात्रेवर निर्बंध येण्याची शक्यतासिन्नर तालुक्यात कोरोनाचा आकडा वाढत आहे. या पार्श्वभूमीवर वडांगळी येथील सतीमाता यात्रोत्सव रद्द करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. याच काळात दोडी येथील श्री म्हाळोबा महाराज यात्रोत्सव असतो. या यात्रेतही लाखाच्या आसपास भाविक दर्शनासाठी येत असतात. महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्रप्रदेश, मध्यप्रदेश येथील धनगर समाज बांधव दर्शनासाठी येत असतात. नवसपूर्तीसाठी मोठी गर्दी होते. त्यानंतर म-हळ येथील खंडोबा महाराज यात्रोत्सव मोठा असतो. मात्र वडांगळी यात्रोत्सव कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रद्द करण्यात आल्याने या दोन यात्रोत्सवावर निर्बंध येण्याची शक्यता आहे.

टॅग्स :NashikनाशिकSocialसामाजिक