शहरं
Join us  
Trending Stories
1
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
2
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
3
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
4
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
5
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
6
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
7
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
8
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
9
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
10
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
11
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
12
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
13
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
14
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
15
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
16
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
17
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
18
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
19
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या

सतीमाता-सामतदादाचा यात्रोत्सव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2020 00:10 IST

वैशिष्ट्यपूर्ण परंपरा व रूढी जपणाऱ्या देशभरातील बंजारा समाजाचे आराध्य दैवत असलेल्या वडांगळी येथील सतीमाता व सामतदादा यात्रोत्सवास शनिवारपासून (दि. ८) प्रारंभ होत आहे. यानिमित्त विविध धार्मिक व करमणुकीच्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यात्रोत्सवाची तयारी पूर्ण झाली आहे. दरम्यान, यात्रेला प्रारंभ होण्यापूर्वीच दीडशेहून अधिक बोकडांचा बळी देत बंजारा भाविकांनी नवसपूर्तीस प्रारंभ केला आहे.

ठळक मुद्देवडांगळी : यात्रेसाठी भाविकांची राज्यभरातून गर्दी

वडांगळी : वैशिष्ट्यपूर्ण परंपरा व रूढी जपणाऱ्या देशभरातील बंजारा समाजाचे आराध्य दैवत असलेल्या वडांगळी येथील सतीमाता व सामतदादा यात्रोत्सवास शनिवारपासून (दि. ८) प्रारंभ होत आहे. यानिमित्त विविध धार्मिक व करमणुकीच्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यात्रोत्सवाची तयारी पूर्ण झाली आहे. दरम्यान, यात्रेला प्रारंभ होण्यापूर्वीच दीडशेहून अधिक बोकडांचा बळी देत बंजारा भाविकांनी नवसपूर्तीस प्रारंभ केला आहे.प्रतिवर्षी माघ पौर्णिमेस होणाºया यात्रेच्या निमित्ताने येथे बंजारा समाजाचा जणू कुंभमेळाच भरत असतो. या समाजातील महिला व पुरुषांनी काळाच्या ओघात आपली पारंपरिक वेशभूषा बाजूला सारल्याचे दिसत असले तरी आपल्या रूढी, प्रथा व परंपरा मात्र जोपासल्या आहेत. धोतर अथवा चोळणा, अंगरखा आणि डोक्यावर लाल रंगाचे पागोटे असा या बंजारा समाजातील पुरुषांचा पूर्वीचा पेहराव असे. तर लाल रंगाचा घागरा, चोळी, कशिदा, कवड्या व आरशांच्या तुकड्यांनी सजविलेली भडक ओढणी, हातात हस्तीदंती कडे, शिंगांच्या व पितळी बांगड्या असा महिलांचा पोशाख मोठ्या प्रमाणावर दिसायचा. तथापि, कालपरत्वे राहणीमानात बदल दिसत असून, पुरुष इतरांसारखे शर्ट-पॅण्ट तर स्रिया सहावारी साड्या परिधान करू लागल्या आहेत. या समाजाकडून पूर्वी ऊस- तोडणीची कामे मोठ्या प्रमाणावर केली जात, मात्र शैक्षणिक सुविधा सर्वत्र उपलब्ध झाल्याने अनेकजण उच्चशिक्षण घेऊन नोकरी-व्यवसाय करू लागल्याचेही आढळून येते. प्रथमश्रेणी अधिकारी म्हणून काहीजण कार्यरत आहेत. इतकेच नव्हे तर राजकीय क्षेत्रातही यांनी आपला ठसा उमटविला आहे.यात्रोत्सवासाठी मोठा पोलीस बंदोबस्तबंजारा समाजाचे श्रद्धास्थान असलेल्या सतीमाता-सामतदादा यात्रेसाठी राज्यभरातून भाविक येतात. त्यासाठी वाहतूक नियोजन करण्यासाठी एमआयडीसी पोलिसांचा मोठा बंदोबस्त असणार आहे. आरोग्य खात्याने रुग्णवाहिका व वैद्यकीय पथक तैनात केले आहे. पंचायत समिती, ग्रामपंचायत व देवस्थानच्या वतीने पाण्यासाठी टॅँकरची व्यवस्था केली आहे. मंदिर परिसराची साफसफाई करण्यात आली आहे. वीजपुरवठा खंडित झाल्यास संस्थानने दोन जनरेटरची व्यवस्था केली आहे.विविध कार्यक्रममाघ पौर्णिमेस शनिवारी दुपारी ४ वाजून २ मिनिटांनी प्रारंभ होणार आहे. तथापि, शनिवार हा बोकडबळीसाठी निषिद्ध मानला जात असल्याने शनिवारी जास्त बोकडबळी दिले जाणार नाही. तथापि, रविवार सुटीचा वार असल्याने भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

टॅग्स :Religious programmeधार्मिक कार्यक्रमReligious Placesधार्मिक स्थळे