शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

सटाणा रोटरी क्लब ,इनरव्हील क्लबचा पदग्रहण सोहळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2019 12:59 IST

सटाणा : कोणतेही काम करताना आत्मविश्वास असणे फार महत्वाचे असते. कारण स्वत:वर विश्वास असेल तर यश आपोआपच मिळते. आत्मविश्वास हीच यशाची गुरु किल्ली आहे. त्यामुळे जर व्यक्तिमत्व सुधारायचे असेल आणि यश खेचून आणायचे असेल तर आत्मविश्वास प्रबळ केला पाहिजे. असे प्रतिपादन व्यक्तिमत्व प्रशिक्षिका मधुरा क्षेमकल्याणी यांनी केले.

सटाणा : कोणतेही काम करताना आत्मविश्वास असणे फार महत्वाचे असते. कारण स्वत:वर विश्वास असेल तर यश आपोआपच मिळते. आत्मविश्वास हीच यशाची गुरु किल्ली आहे. त्यामुळे जर व्यक्तिमत्व सुधारायचे असेल आणि यश खेचून आणायचे असेल तर आत्मविश्वास प्रबळ केला पाहिजे. असे प्रतिपादन व्यक्तिमत्व प्रशिक्षिका मधुरा क्षेमकल्याणी यांनी केले.येथील रोटरी क्लब आॅफ सटाणा मिडटाऊन व इनरव्हील क्लब आॅफ सटाणा मिडटाऊन यांच्या सयुक्त विद्यमाने आयोजित पदग्रहण समारंभ कार्यक्र म आयोजित करण्यात आला होता. यावेळी क्षेमकल्याणी बोलत होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून नगराध्यक्ष सुनील मोरे, महाराष्ट्र चेंबर्स आॅफ कॉमर्सचे अध्यक्ष संतोष मांडलेचा, पोलिस निरीक्षक वासुदेव देसले, डिस्ट्रिक गव्हर्नरराजेंद्र भामरे, गिरिषा ठाकरे, विलास शिरोरे, यशवंत अमृतकर होते. रोटरी मिडटाऊनच्या नूतन अध्यक्षपदाची सूत्रे सचिन दशपुते यांनी मावळते अध्यक्ष विवेक जगताप यांच्या कडून स्वीकारले तर नूतन सचिवपदाची सूत्रे विद्या अमृतकार यांनी स्वीकारले तसेच इनरव्हील क्लब च्या नूतन अध्यक्षपदाची सूत्रे स्मिता येवला यांनी मावळत्या अध्यक्ष रूपाली कोठावदे यांच्या कडून स्वीकारले. सचिवपदाची सूत्रे रूपाली जाधव यांनी स्वीकारली. महालक्ष्मी देवी मंदिराचे अध्यक्ष सुरेश येवला, पेन्शनर्स संघटनेचे अध्यक्ष प्रकाश बधान, दत्तात्रय कोठवदे यांच्या सामाजिक कार्याबद्दल व रोटरी पाल्यांचा गुणगौरव करून सत्कार करण्यात आला. व्यापारी असोसिएशनच्यावतीने दिलीप चव्हाण यांनी संतोष मंडलेचा यांचा सत्कार केला. कार्यक्र मास जगदीश मुंडावरे, अमोल अंधारे, अतुल पाटील, चंद्रकांत विखंकर, मनोज येवला, परेश कोठावदे, प्रकाश सोनग्रा, राहुल जाधव, संजय नेरकर, संजय येवला, सुरेश येवला, अँड.अभिमन्यू पाटील, रु पाली पंडित, नयन कोठावदे, रूपाली निकुंभ, रेखा वाघ,मीनल मुंडावरे, संगीता खानकरी, अर्चना सोनवणे, सुनिता धोंडगे, सुनिता महाजन, साधना पाटील, आदि उपस्थित होते.प्रास्ताविक विवेक जगताप यांनी केले. सूत्रसंचालन तुषार महाजन यांनी केले तर आभार विद्या अमृतकार यांनी मानले. 

टॅग्स :Nashikनाशिक