शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

सरपंचाने पाझर तलाव फोडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2019 17:38 IST

चौगाव येथील प्रकार : तहसिलदाराकडे प्रतिज्ञापत्राद्वारे दिली कबुली

ठळक मुद्देसरपंच मांडवडे यांनी धरणात आलेले पाणी आपल्या शेतात जाऊ नये, यासाठी अजमीर सौंदाणेकडे राहणा-या शेतकक-यांचा विचार न करता बांध फोडून टाकला.

सटाणा : तालुक्यातील चौगाव, अजमीर सौंदाणे व क-हे शिवारात शासनाने लाखो रु पये खर्चून शेतकऱ्यांसाठी बांधलेल्या लखमी पाझर तलावात चौगावच्या सरपंचाने अतिक्र मण केले असून आपली द्राक्ष व डाळिंबाची बाग पाण्याखाली जाऊ नये यासाठी शेतकऱ्यांचा विचार न करता पाझर तलावाचा बंधारा फोडून टाकल्याची तक्रार शेतक-यांनी केली आहे. सदर सरपंचा विरोधात फौजदारी गुन्हा दाखल करावा आणि १५ नोव्हेंबरच्या आत तलावाच्या बंधा-याचे काम पूर्ण करावे अन्यथा बागलाण तहसील कार्यालयासमोर बेमुदत उपोषण छेडण्याचा इशारा संतप्त शेतक-यांनी निवेदनाद्वारे दिला आहे. दरम्यान, सदर सरपंचाने तलाव फोडल्याची कबुली दिली असून तहसिलदारांकडे दिलेल्या प्रतिज्ञापत्रात दोन दिवसात तलावाचे बांधकाम करुन देण्याची ग्वाही दिली आहे.शेतक-यांनी बागलाणचे तहसीलदार जितेंद्र इंगळे-पाटील यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, सोळा वर्षांपूर्वी शासनाने अजमीर सौंदाणे, क-हे व चौगाव शिवारात पंधरा ते वीस लाख रु पये खर्चून लखमी पाझर तलाव बांधला होता. मात्र या पाझर तलावात चौगावचे सरपंच लक्ष्मण मांडवडे यांनी पदाचा गैरवापर करून ऐंशी टक्के क्षेत्रात अतिक्र मण केले. धरणाच्या बंधा-यालगत शेततळे तयार करून त्याचाही लाभ घेतला आहे. बारा वर्षापासून धरण परिसरातील शेतकरी दुष्काळाच्या झळा सोसत आहेत. हजारो रूपये खर्चून टँकरने शेती व पिण्यासाठी विकतचे पाणी आणत आहेत. यावर्षी चांगला पाऊस झाला आणि धरणात पाणी आले. मात्र सरपंच मांडवडे यांनी धरणात आलेले पाणी आपल्या शेतात जाऊ नये, यासाठी अजमीर सौंदाणेकडे राहणा-या शेतकक-यांचा विचार न करता बांध फोडून टाकला. स्थानिक नागरिकांनी त्यास विरोध केला असता त्यांनाच दमदाटी केल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. सदर बांध फोडल्यामुळे लखमी नाल्यालगतच्या शेतक-यांच्या घरांमध्ये पाणी शिरले तसेच पिकांचेही मोठे नुकसान झाले. मांडवडे यांच्या कृत्यामुळे धरण परिसरातील हजारो हेक्टर जमीन ओलिताखाली येण्यापासून वंचित राहणार असल्याचेही निवेदनात म्हटले आहे. शासनाने सरपंच मांडवडे यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करावा व १५ नोव्हेंबरपर्यंत बंधा-याचे कामही पूर्ण करावे अन्यथा तहसील कार्यालयासमोर बेमुदत उपोषणाचा इशाराही निवेदनात देण्यात आला आहे. नजर चुकीने फोडलापत्नी ललिता मांडवडे यांच्या नावे तहसीलदारांना सादर केलेल्या प्रतिज्ञापपत्रात, मी केलेला गुन्हा हा फौजदारी स्वरूपाचा आहे, याची मला जाणीव आहे. माझ्या नावाने शेतीच्या क्षेत्रात पाझर तलाव असून लखमी पाझर तलावाचा भराव माझ्याकडून नजर चुकीने फोडला गेला आहे. पाझर तलावाचे बांधकाम येत्या १५ नोव्हेंबर पर्यंत मी स्वखर्चाने पूर्ण करून देईन. ते पूर्ण न केल्यास होणा-या शिक्षेस मी तयार असेन, असे लिहून दिले आहे.- लक्ष्मण मांडवडे, सरपंच, चौगाव

टॅग्स :Nashikनाशिक