शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

गोदावरी स्वच्छतेसाठी सरपंच झाले आक्रमक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2018 00:13 IST

नाशिक महानगरपालिकेतून गोदावरी नदीपात्रात सोडले जाणारे सांडपाणी आणि नदीला विळखा घालणाऱ्या पाणवेलींमुळे नदीचे पाणी खराब होऊन मृत्युमुखी पडलेल्या हजारो मासे आणि साथीचे रोग पसरण्याची शक्यता असल्याने गोदाकाठच्या ४२ गावातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात येईल म्हणून पाणवेली तत्काळ काढाव्यात, नदी स्वच्छतेची मोहीम हाती घेण्यात यावी अशा आशयाचे निवेदन आणि संबंधित पत्रव्यवहार जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांच्याशी करण्यात आला आहे.

सायखेडा : नाशिक महानगरपालिकेतून गोदावरी नदीपात्रात सोडले जाणारे सांडपाणी आणि नदीला विळखाघालणाऱ्या पाणवेलींमुळे नदीचे पाणी खराब होऊन मृत्युमुखी पडलेल्या हजारो मासे आणि साथीचे रोग पसरण्याची शक्यता असल्याने गोदाकाठच्या ४२ गावातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात येईल म्हणून पाणवेली तत्काळ काढाव्यात, नदी स्वच्छतेची मोहीम हाती घेण्यात यावी अशा आशयाचे निवेदन आणि संबंधित पत्रव्यवहार जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांच्याशी करण्यात आला आहे. पालकमंत्री महाजन मुंबईत असल्याने शिष्टमंडळ प्रत्यक्ष भेट घेऊ शकत नाही; मात्र लवकरच गोदाकाठच्या सर्व गावातील सरपंच आणि पदाधिकारी यांच्या समवेत ग्रामपंचायत ठराव आणि निवेदन देण्यात येणार आहे. गोदावरीला आलेल्या पाण्यामुळे यापूर्वी सायखेडा, चांदोरी, करंजगाव आदी भागात अडकलेल्या पाणवेली वाहून गेल्या, तर पुन्हा नाशिक भागातून पाणवेली वाहत आल्या आहे. नदीपात्रात आढळणारे कोंबडा, रऊ, कटली, मरळ, शिंगी, वाडीस, तालेपा, बळू, माळी, बोदीड, गेरुंजी, सोनार, भिंगार, खडशी, नवरंग, झिंगा, वाबळी, वाम, बांगूर आदी हजारो मासे मृत झाले आहे. दूषित पाण्याने पाण्यावर हिरवाई, तसेच मृत माशांचा थर, त्यातग्रामस्थांना दूषित पाणीपुरवठा होत असल्याने समस्यांत आणखी भर पडत आहे. त्यामुळे प्रशासनाने तत्काळ पाऊलेउचलावी, अशी मागणी माहिती जिल्हा परिषदेचे सदस्य सिद्धार्थ वनारसे यांनी केली आहे.पाण्याला दुर्गंधी, आरोग्याच्या तक्रारीगोदावरी उगमस्थानापासूनच समस्यांच्या विळख्यात अडकली आहे. त्यात नाशिक महानगरपालिका हद्दीतील, औद्योगिक वसाहतींमधील सांडपाणी नदीपात्रात सोडले जात असल्याने, गोदाकाठ भागातील ग्रामस्थांना दूषित पाणी प्यावे लागते. ओढा येथे गोदातीरावर असलेल्या डॅमवर अनेक दिवसांपासून पाणी साचून होते, हे पाणी आवर्तन आल्याने गोदाकाठ भागात वाहून येत, या भागात पाण्याला दुर्गंधी येत आहे. तर आवर्तन सोडले जाते तेव्हा पाणी पुढे जावे, यासाठी गोदाकाठ भागातील वीजपुरवठा खंडित केला जात असल्याने, नेहमीच पाणी असलेल्या गोदाकाठ भागातील शेतकरी, ग्रामस्थांना पाणी असूनही नाहक त्रास सहन करावा लागतो. सदर प्रश्न ‘लोकमत’ने प्रकाशझोतात आणला होता. या संदर्भात बातम्या प्रकाशित झाल्यानंतर हालचालींना वेग आला आहे.

टॅग्स :godavariगोदावरीriverनदी