शहरं
Join us  
Trending Stories
1
नोकरी शोधणाऱ्यांसाठी खुशखबर ! 'या' सरकारी संस्थांमध्ये १०० टक्के पदभरतीस मान्यता
2
डोनाल्ड ट्रम्प यांनी मित्र राष्ट्रांवर टाकला टॅरिफ बॉम्ब; जपान आणि दक्षिण कोरियातल्या वस्तूंवर २५ टक्के कर
3
Video: मान गए माही... MS Dhoni ने क्रिकेट संघटनेच्या कर्मचाऱ्यांसोबत साजरा केला वाढदिवस
4
एकाच कुटुंबातील ५ जणांना जिवंत जाळलं; संपूर्ण गाव शांत पण मुलाने सगळं समोर आणलं
5
"चालक नसल्याने नवीन बससेवा सुरु करता येणार नाही"; परिवहन विभागाच्या पत्रावर राजू शेट्टींचा संताप
6
CCTV: धावत्या स्कूल व्हॅनच्या डिक्कीतून पडले विद्यार्थी; चालकाला पत्ताच नाही, रिक्षावाल्यामुळे वाचले
7
भारतीयांचा जगात डंका ! ICCच्या CEO पदी संजोग गुप्ता यांची निवड, ठरले केवळ दुसरे भारतीय
8
OYO हॉटेलमध्ये एका तासासाठी खोली कशासाठी दिली जाते? सरकारने माहिती घेण्याची मुनगंटीवारांची मागणी
9
"डार्लिंग, काम झालं..."; माय-लेकींचं अफेअर, बॉयफ्रेंडसाठी वडिलांचा काढला काटा, झाला पर्दाफाश
10
पुतिन यांनी काही तासांपूर्वीच मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली; आता सापडला मृतदेह
11
Video: "लाज वाटू द्या, गिधाडांनो"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावले, रोहिणी खडसेंचा संताप
12
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
13
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
14
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
15
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
16
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
17
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
18
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
19
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
20
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"

बागलाण तालुक्यातील सरपंच आक्रमक

By admin | Updated: September 1, 2015 22:46 IST

आढावा बैठक : वाळू तस्करीवरून वादंग; प्रांताधिकाऱ्यांनी केला जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न

सटाणा : पावसाने तब्बल महिन्यापासून दडी मारल्याने भूजल पातळीत कमालीची घट झाली आहे. त्यामुळे बागलाण तालुक्यातील जनतेपुढे यंदा पावसाळ्यात जलसंकट उभे ठाकले असून, आठ आठ दिवस पाणी कपातीमुळे खेड्यापाड्यातील जनता आणि जनावरे पाण्यासाठी कासावीस झाली आहेत. सोमवारच्या टंचाई बैठकीत तालुक्यातील सर्वच सरपंचांनी पाण्यासाठी टाहो फोडत जलसंकटावर मात करण्यासाठी प्रभावी उपाययोजना राबविण्याची मागणी केली.दरम्यान, या बैठकीत जलसंकटाला बेसुमार वाळूउपसाच कारणीभूत असल्याचे निदर्शनास आणून देत वाळूमाफियांची महसूल आणि पोलीस यंत्रणेशी सलगी असल्याचा आरोप करण्यात आला. वाळूउपशाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांवर भरदिवसा हल्ले होत असल्याचा गंभीर आरोप उपस्थित सरपंचांनी केल्याने बैठकीत चांगलाच गोंधळ उडाला.येथील पंचायत समितीच्या सभागृहात सोमवारी आमदार दीपिका चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली टंचाई आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीस तालुक्यातील सर्व सरपंच, प्रांत संजय बागडे, नायब तहसीलदार आबासाहेब तांबे यांच्यासह सर्व खातेप्रमुख उपस्थित होते. सुरुवातीलाच काही ज्येष्ठ सरपंचांनी बैठकीवर आक्षेप घेत फक्त टंचाई आराखडा तयार करण्याचे आदेश होतात प्रत्येक्षात मात्र कुठल्याही प्रकारच्या उपाययोजना होत नसल्याने हा सर्व फार्स असल्याचे सांगून प्रशासनाच्या उदासीनतेबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. याबाबत चव्हाण यांनी गंभीर दखल घेत टंचाईच्या उपाययोजनाच्या कामात कोणी कसूर केल्यास त्याची गय केली जाणार अशा कडक शब्दांत अधिकाऱ्यांना फटकारले. तालुक्यात पावसाने दडी मारल्यामुळे हरणबारी आतण केळझर हे दोन्ही मध्यम प्रकल्प अद्याप भरले नाही. तसेच आठ लघुप्रकल्प कोरडीच असल्याने काटवन, मोसम, करंजाडी, हत्ती, कान्हेरी, आरम, गिरणा आणि पूर्व बागलाणमध्ये प्रचंड जलसंकट उभे ठाकले आहे. पावसाअभावी पिके करपून लागली आहेत. गुरांना चारा नाही. विहिरींनी तळ गाठल्यामुळे गावागावात आठ आठ दिवस पाणी मिळत नाही, अशी भयावह परिस्थिती उपस्थित सरपंचांनी कथन केली. या संकटावर मात करण्यासाठी पाणी आडवा, पाणी जिरवा सारखे कार्यक्र म प्रभावीपणे राबविण्याची मागणी यावेळी करण्यात आली. तसेच वृक्ष लागवडीवर भर देऊन त्यांच्या संवर्धनासाठी सामूहिकरीत्या प्रयत्न करावेत, असा सूरही या बैठकीत निघाला. बैठकीस पंचायत समिती सभापती जिजाबाई सोनवणे, उपसभापती वसंतराव भामरे, महेंद्र भामरे, माजी आमदार संजय चव्हाण, जिल्हा परिषद सदस्य शैलेश सूर्यवंशी, सुनीता पाटील, प्रा. अनिल पाटील, प्रशांत बच्छाव, पं. स. सदस्य वीरेश घोडे, लक्ष्मण सोनवणे, जयराम अहिरे, सतीश विसपुते, सोमनाथ सोनवणे, भास्कर बच्छाव, रखमाबाई सोनवणे, मायावती धिवरे, अहिल्याबाई माळी यांच्यासह जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष राघो अहिरे, राजेंद्र सोनवणे, नारायण खैरनार, अशोक सावंत, अनिल बोरसे, नामपूरचे सरपंच प्रमोद सावंत, संजय पवार, मंगेश पवार, प्रवीण भामरे, किशोर ह्याळीज, शरद भामरे, शक्ती दळवी, किरण बिरारी आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.(वार्ताहर)