शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

सरकारवाडा : राजस्थानमध्ये मौजमजा करणाऱ्या सोनसाखळी चोरास ठोकल्या बेड्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2019 13:37 IST

सरकारवाडा पोलिस ठाण्याच्या हद्दीत सुमारे दोन महिन्यांपुर्वी प्रमोद महाजन उद्यान परिसरात एका पादचारी महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावून पळ काढणारा संशयित सरफराज उर्फ फिरोज बेग (२९) यास अजमेरमधून अटक करण्यास सरकारवाडा पोलिसांना यश आले.

ठळक मुद्देन्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावून पळ

नाशिक : शहर व परिसरात मागील काही दिवसांपासून सोनसाखळी चोरीच्या वाढत्या घटनांना आळा घालण्यासाठी आता पोलिसांनी कंबर कसली आहे. दोन दिवसांपुर्वीच गुन्हे शाखेने दोघा सोनसाखळी चोरट्यांना ताब्यात घेतले. त्यानंतर सरकारवाडा पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोधपथकाने एका सराईत सोनसाखळी चोरट्याला थेट राजस्थानमधील अजमेर शहरात जाऊन बेड्या ठोकल्या.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सरकारवाडा पोलिस ठाण्याच्या हद्दीत सुमारे दोन महिन्यांपुर्वी प्रमोद महाजन उद्यान परिसरात एका पादचारी महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावून पळ काढणारा संशयित सरफराज उर्फ फिरोज बेग (२९) यास अजमेरमधून अटक करण्यास सरकारवाडा पोलिसांना यश आले. त्याला न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली असून त्याच्याकडून शहरातील विविध गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे. सरकारवाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक हेमंत सोमवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे संशयित गुन्हेगाराचा माग काढत त्याच्या परराज्यातून मुसक्या आवळल्या. तेथे सतत तीन दिवस दबा धरून बसल्यानंतर सरफराज हा पथकाच्या हाती लागला. त्यास ताब्यात घेऊन पोलिस पथक नाशिकमध्ये दाखल झाले. बेग यास रविवारी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने मंगळवारपर्यंत (दि.१९) पोलीस कोठडी सुनावली.सोनसाखळी चोरी केल्यानंतर बेग याने नाशिकसह महाराष्टÑ सोडले होते. तो राजस्थान राज्यातील अजमेर, जयपूरसारख्या अन्य शहरात मौजमजा करत होता. याबाबतची खात्रिशीर माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी तेथे सापळा रचून त्यास अटक केली. काही दिवसांपुर्वी गुन्हे शाखेच्या पथकाने अशाच पध्दतीने अक्षय उत्तम जाधव (२३,रा.चुंचाळे) यास थेट दमण केंद्रशासित प्रदेशातून अटक केली. त्यानेही सोनसाखळी चो-या केल्यानंतर दमण गाठले होते. तेथे तो मौजमस्ती करत असल्याची गुप्त बातमी पथकाला होती. त्याची कसून चौकशी केली असता पोलिसांनी त्याचा दुसरा साथीदार संशयित सुनील जयराम ताठे उर्फ घा-या (२१,रा.चुंचाळे) यालाही अटक केली आहे. या आठवडाभरात तीन सोनसाखळी चोर गजाआड करण्यास पोलिसांना यश आले आहे.

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयArrestअटकChain Snatchingसोनसाखळी चोरीRajasthanराजस्थान