सरस्वती विद्यालयाची यशाची परंपरा कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2021 11:48 PM2021-07-21T23:48:31+5:302021-07-22T01:18:39+5:30

लासलगाव : नुकताच मार्च २०२१ मध्ये इयत्ता दहावीचा निकाल जाहीर करण्यात आला. लासलगाव विद्या प्रसारक मंडळ, लासलगाव संचलित सरस्वती माध्यमिक विद्यालयाचा निकाल १०० टक्के लागला असून विद्यार्थ्यांनी यशाची परंपरा कायम राखली आहे.

Saraswati Vidyalaya's tradition of success continues | सरस्वती विद्यालयाची यशाची परंपरा कायम

सरस्वती विद्यालयाची यशाची परंपरा कायम

Next
ठळक मुद्देमुख्याध्यापक व सर्व शिक्षकांनी कौतूक केले.

लासलगाव : नुकताच मार्च २०२१ मध्ये इयत्ता दहावीचा निकाल जाहीर करण्यात आला. लासलगाव विद्या प्रसारक मंडळ, लासलगाव संचलित सरस्वती माध्यमिक विद्यालयाचा निकाल १०० टक्के लागला असून विद्यार्थ्यांनी यशाची परंपरा कायम राखली आहे.

शाळेतून परीक्षेसाठी ८७ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. यात अक्षदा सतीश काळे (९७.२०) प्रथम, सचिन ज्ञानेश्वर शिंदे (९७.००) द्वितीय, अनुष्का नंदू औटे (९६.६०) तृतीय, उन्नती सचिन गांगुर्डे (९६.४०) चतुर्थ, किर्ती दिपक धात्रक (९५.८०) पाचवी गुणवत्तेत उर्तीण झाले.
यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्था अध्यक्ष अशोक होळकर, उपाध्यक्ष एस्. बी.मुलानी, सेक्रेटरी जगदीश होळकर, सदस्य बाळासाहेब बोरसे, मुख्याध्यापक व सर्व शिक्षकांनी कौतूक केले.

Web Title: Saraswati Vidyalaya's tradition of success continues

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.