सिन्नर : सिन्नर पोलिसांच्या पथकाने सराईत दोघा चोरट्यांना तलवार घेऊन फिरत असताना अटक केली असल्याची माहिती पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख यांनी दिली.औरंगाबाद येथे झालेल्या दंगलीच्या पार्श्वभूमीवर पोलीस निरीक्षक देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार भगवान शिंदे, प्रवीण गुंजाळ, विनोद टिळे हे गस्त घालत असताना शनिवारी रात्री ९.३० वाजेच्या सुमारास सरदवाडी परिसरात सिन्नर-पुणे बायपासजवळ पुलाखाली दोन संशयित हालचाल करीत असल्याचे दिसल्याने त्यांना हटकले. पोलीस पथकाला पाहून ते पळू लागले पाठलाग करून पोलीस पथकाने त्यांना ताब्यात घेतले. त्यांची झडती घेतली असता त्यांच्याकडे लोखंडी धातूची २१ इंच लांबीची तलवार मिळून आली.त्यांच्याकडे चौकशी केली असता त्याने त्यांची नावे अर्जुन मोहन चव्हाण (२३) व राजू मोहन चव्हाण (२०) असे सांगून ते दोघे अश्विनी कॉलनी, सामनगाव पॉलिटेक्निकसमोर राहत असल्याचे सांगितले. सिन्नर पोलीस ठाण्यात भारतीय हत्यार कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी अर्जुन चव्हाणवर नाशिकरोड पोलीस ठाण्यात यापूर्वी गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली. यापूर्वीही सिन्नर पोलिसांनी तलवारीसह एकाला अटक केली होती.
सराईत चोरट्यांना तलवारीसह अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2018 01:49 IST
सिन्नर : सिन्नर पोलिसांच्या पथकाने सराईत दोघा चोरट्यांना तलवार घेऊन फिरत असताना अटक केली असल्याची माहिती पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख यांनी दिली.
सराईत चोरट्यांना तलवारीसह अटक
ठळक मुद्देयापूर्वीही सिन्नर पोलिसांनी तलवारीसह एकाला अटक केली