शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानवर ‘फिरकी बाॅम्ब’; इंडियाचा मैदानावरही 'बदला'; हायव्होल्टेज सामन्यात पाकचा दणदणीत पराभव
2
‘जिल्हा परिषदां’ना बळ मिळेल? पूर्वी जिल्हा परिषद अध्यक्षांना राज्यमंत्री पदाचा दर्जा होता
3
सायबर भामट्यांनी साेडले खात्यात केवळ ८६ रुपये; बोलण्यात गुंतवून पाठवली लिंक
4
मी शिवभक्त, विष गिळून टाकतो, पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; काँग्रेसने घुसखोरांना प्रोत्साहन दिले, गरिबांना नाकारले
5
महाराष्ट्रात एका वर्षात ‘आयुष्मान’चे लाभार्थी तिप्पट; ग्रामीण भागापर्यंत विस्तार करण्याचे राज्यासमोर आव्हान
6
मोबाइलमध्ये अडकलेली तरुणाई सरस्वतीच्या दरबारात नेणार : विश्वास पाटील
7
प्रभादेवी तिकीट कार्यालयाचे स्थलांतर कुठे? २ ते ३ दिवसांमध्ये जागा निश्चित करणार
8
बांधकामातील बदल, कराने वाढला कोस्टल रोडचा खर्च; महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या शेवटच्या टप्प्यात २ हजार कोटींची वाढ
9
नेपाळच्या आगीत कोण आपली पोळी भाजते आहे?
10
साहित्य संमेलनाध्यक्षपदी ‘पानिपत’कार विश्वास पाटील ; १ ते ४ जानेवारीदरम्यान संमेलन होणार
11
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
12
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
13
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
14
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
15
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
16
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
17
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
18
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
19
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)

सामान्य कार्यकर्ता ते थेट महापौरपदापर्यंत सतीशनानांची झेप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2019 01:00 IST

नाशिक महापालिकेतील पाच वेळा निवडून येणाऱ्या मोजक्या नगरसेवकांमध्ये समावेश असलेल्या सतीशनाना कुलकर्णी यांनी सामान्य कार्यकर्ता ते महापौर अशी मोठी मजल मारली आहे.

नाशिक महापालिकेतील पाच वेळा निवडून येणाऱ्या मोजक्या नगरसेवकांमध्ये समावेश असलेल्या सतीशनाना कुलकर्णी यांनी सामान्य कार्यकर्ता ते महापौर अशी मोठी मजल मारली आहे. लहान वॉर्ड नंतर त्याचे मोठे प्रभाग झाले. त्यानंतर बहुसदस्यीय प्रभाग झाल्यानंतर सतत निवडून येण्याची किमया त्यांनी साधली आहे. प्रभागातील समस्या असो अथवा कोणतीही अडचण हक्काचे नाना हे प्रभागातील नगरसेवकांना सहज उपलब्ध होतात आणि म्हणूनच शहराचा प्रथम नागरीक म्हणून त्यांची झालेली निवड ही त्यांना अधिक आनंदीत करणारी ठरली अहे.डीजीपी नगर येथे वास्तव्यास असलेले सतीश नाना याच भागातील प्रभाग क्रमांक २३ मधून नगरसेवक म्हणून निवडून आलेले आहेत. खरे तर सतीशनाना हे सामान्य कुटुूंबातील आहेत. मायको (बॉश) कंपनीत त्यांनी कर्मचारी म्हणून तीस वर्षे नोकरी केली. दरम्यान, (कै.) अटलबिहारी वाजपेयी यांच्या प्रेरणेतून त्यांनी भाजपचे काम सुरू केले. पक्षातून समाज कार्याची संधी मिळाल्याने त्यांचा लोकसंग्रह वाढत गेला. त्यानंतर त्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली आणि पूर्णवेळ राजकारण सुरू केले. त्यानंतर त्यांनी सामाजिक कार्याची कास सोडली नाही. गेल्या ३५ वर्षांपासून ते भाजपात आणि सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहेत.सतीश कुलकर्णी यांनी १९९७ मध्ये प्रभाग क्रमांक ४३ मधून प्रथम निवडणूक लढविली.त्यात ते निवडून आल्यानंतर त्यांनी त्यांच्या वागणूकीने कामाचा ठसा उमटविला,. २००२ मध्ये प्रभाग क्रमांक २३ मधून आणि सन २०१२ मध्ये प्रभाग क्रमांक ३८ मधून ते नगरसेवक म्हणून निवडून आले. २०१७ मध्ये देखील सर्वाधिक मते घेऊन त्यांनी यश मिळवले. नगरसेवक असतानाच ते २००४ ते २००७ या कालावधीत ते भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष होते. तेच सन २०१२ ते २०१४ या दोन वर्षाच्या कालावधीत ते शहराच्या उपमहापौरपदाची धुरा त्यांनी सांभाळली होती. या पदावर काम करताना त्यांनी नामधारी न रहाता भरीव कार्य केले. विशेषत: आरोग्य स्वच्छता व पर्यावरण समतोल राखण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील होते.विविध सामाजिक उपक्रमांत सहभागसतीश नाना कुलकर्णी हे अनेक सामाजिक उपक्रमात नेहमीच अग्रभागी असतात. अनेक सामाजिक संस्थांवर ते पदाधिकारी म्हणून कार्यरत आहेत. श्री विघ्नहर गणेश देवस्थान ट्रस्टचे ते संस्थापक अध्यक्ष आहेत. तसेच आदिशक्ती स्त्री प्रतिष्ठान व वंदे मातरम् प्रतिष्ठान या दोन्ही संस्थाचेदेखील संस्थापक अध्यक्ष आहेत. तसेच ‘सार्वजनिक उत्सव समिती डीजीपीनगर क्रमांक १’ या समितीचे संस्थापक अध्यक्ष आहेत.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाMayorमहापौरElectionनिवडणूकBJPभाजपा