शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
5
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
8
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
9
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
10
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
11
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
12
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
13
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
14
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
15
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
16
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
17
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
18
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
19
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
20
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

संत कबीरनगरात मूलभूत सुविधांची वानवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2019 00:04 IST

गंगापूररोडवरील भोसला शाळेच्या मागे वसलेली संत कबीरनगर वसाहत ३० ते ३५ वर्षांपासून आहे. नाशिक महापालिकेने येथील काही रहिवाशांना घरपट्टी लागू केली तर अनेकांना त्यापासून वंचित ठेवण्यात आले आहे. त्यामुळे महापालिकेचा महसूल बुडत असून, नागरिक स्वत: घरपट्टी भरण्यास तयार असतानाही मनपाकडून घरपट्टी आकारण्यास टाळाटाळ केली जात आहे.

समस्यांचा फेरा कबीरनगर वसाहतगंगापूर : गंगापूररोडवरील भोसला शाळेच्या मागे वसलेली संत कबीरनगर वसाहत ३० ते ३५ वर्षांपासून आहे. नाशिक महापालिकेने येथील काही रहिवाशांना घरपट्टी लागू केली तर अनेकांना त्यापासून वंचित ठेवण्यात आले आहे. त्यामुळे महापालिकेचा महसूल बुडत असून, नागरिक स्वत: घरपट्टी भरण्यास तयार असतानाही मनपाकडून घरपट्टी आकारण्यास टाळाटाळ केली जात आहे. घरपट्टी लागू झाल्यास नागरिकांना मूलभूत सुविधा द्याव्या लागतील म्हणूनच महापालिका प्रशासन टाळाटाळ करीत असल्याचा आरोप येथील नागरिकांनी केला आहे.संत कबीरनगरातील लोक सातपूरच्या औद्योगिक कारखान्यांमध्ये तसेच गंगापूररोडवर व्यवसाय करून उपजीविका भागवितात. महापालिका क्षेत्रात या वसाहतीचा समावेश असला तरी, सुविधा पुरविण्यात नेहमीच दुर्लक्ष केले जाते. या भागात घंटागाडी वेळेवर येत नाही, रस्ते अरुंद असल्याचे कारण देऊन महापालिका प्रशासनाने घंटागाडी बंद करून टाकली. त्यामुळे येथील नागरिक आपला कचरा नाशिक उजवा कालव्यात टाकतात. त्यामुळे परिसरात डास वाढल्याने डेंग्यू, चिकुनगुन्या, थंडी-ताप, मलेरिया यांसारखे आजार पसरण्याचा धोका संभवतो. संत कबीरनगर वसाहतीत पाणी कमी दाबाने आणि गढूळ येत असल्याने रोगराई पसरण्याचा धोका वाढला आहे. हा भाग प्रभाग क्रमांक ८ मध्ये येतो. या भागात घंटागाडी बंद झाल्याने नागरिकांनी कचरा टाकायचा तरी कुठे असा प्रश्न संजू गव्हाणे यांनी केला आहे. अरुंद गल्ली व रस्ते असल्याने मोठी घंटागाडी वसाहतींमध्ये येत नव्हती; मात्र महापालिकेने नंतर छोटी घंटागाडी सुरू केली होती. नंतर ती बंद झाल्याने तो रस्त्याच्याकडेला अथवा पाटात टाकावा लागतो अशी तक्रार नंदू खोबे यांनी केली आहे.या भागात स्वच्छता मोहीम, औषध फवारणी धूर फवारणी करावी मात्र महापालिका प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे भीमराव दोंदे यांनी सांगितले. या वसाहतीत साधारण ३०० च्या वर झोपड्या आहेत घरपट्टी लागू करावी अशी मागणी वामन बेंडकुळे यांनी केली.लहान मुले चौकात खेळतात, त्यांच्या दृष्टिकोनातून परिसरात साफ सफाई झाली पाहिजे, रोजच्या रोज कचरा उचलला गेल्यास आरोग्याचे प्रश्न निर्माण होणार नाही. गटारींची साफ सफाई होत नसल्याने परिसरात दुर्गंधी सुटली आहे.  - शशिकला साळवे, रहिवासी

 

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाNashikनाशिक