शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
3
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
4
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
5
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
6
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
7
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
8
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
9
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
10
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
11
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
12
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
13
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
14
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
15
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
16
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
17
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
18
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
19
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
20
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे

"फिल्टर"च्या पाण्याने माठावर संक्रांत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2021 18:21 IST

चांदोरी : ग्रामीण भागात जाणवणारी पाणी टंचाई तसेच दूषित पाण्यापासून होणारे आजार टाळण्यासाठी ग्रामस्थ बाटली बंद पाणी किंवा पिण्याच्या ...

ठळक मुद्देचांदोरी : मागणी घटली ; पाण्याच्या जारला आले महत्त्व

चांदोरी : ग्रामीण भागात जाणवणारी पाणी टंचाई तसेच दूषित पाण्यापासून होणारे आजार टाळण्यासाठी ग्रामस्थ बाटली बंद पाणी किंवा पिण्याच्या पाण्यासाठी सर्रास जारच्या पाण्याला महत्त्व देत आहे. पर्यायाने पारंपरिक माठ विक्री व्यवसायात मंदीचे सावट पसरले आहे. कमी पैशात सहजगत्या शुद्ध पाणी उपलब्ध होते, शिवाय थंड करण्यासाठी घरातील फ्रीज उपलब्ध असल्याने आज तरी मातीच्या माठाचे अस्तित्व धोक्यात आले आहे.वर्षानुवर्षे पारंपरिक पद्धतीने फिरत्या चाकावर माठ तयार केले जात होते. उन्हाळा आला की त्याची सर्वत्र विशेष मागणी असायची. आता दिवसाला केवळ ८ ते १० माठाची विक्री होत आहे. सध्या विविध इलेक्ट्रॉनिक कंपन्या सवलतीच्या दरात अनेक नवनविन उपकरणे उपलब्ध करून देत असल्याने नागरिकांचा कल त्याआधुनिक वस्तूंकडे अधिक वाढत आहे. शिवाय ऐन उन्हाळ्यात पाण्याच्या जारला मागणी वाढत आहे. शहरापासून ग्रामीण भागापर्यंत पाण्याचे प्लांट सुरू झाल्याने नागरिकांचा कलही त्यांच्याकडे वाढला आहे.१० रुपयात २० लिटर शुद्ध पाणी शुद्ध करून मिळते तसेच ती ही घरपोच सेवा असल्याने प्रत्येकाच्या घरात माठा ऐवजी जारच दिसत आहेत. पूर्वी १५० ते २०० रुपयांना मिळणारे माठ नागरिक दोन दोन वर्षे वापरत होते. मात्र सध्या रोजच्या पाण्यासाठी जास्त खर्च करण्याची तयारी दिसून येते. पर्यायाने माठाला मागणी काही प्रमाणात ओसरली आहे.ग्रामीण भागात ही फिल्टर प्लांट सुरू झाल्याने नागरिक जारच्या पाण्याला महत्त्व देत असून अनेकांना रोजगार ही मिळाला आहे.- निलेश कोटमे, संचालक वॉटर प्लॅन्ट, चांदोरी.                   

 

टॅग्स :Rural Developmentग्रामीण विकासSummer Specialसमर स्पेशल