शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?
3
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  
4
'बुके नको बुकं द्या'! बिरदेव डोणेचं आवाहन, बॉलिवूड अभिनेत्रीच्या बॉयफ्रेंडने पाठवली हजार पुस्तकं
5
'जबाबदारीच्या वेळीच बेपत्ता'; काँग्रेसचा PM मोदींवर वार, भाजपचे नेतेही भडकले
6
प्रीती झिंटा भाजपमध्ये प्रवेश करणार? अभिनेत्रीने केला खुलासा, म्हणाली- "मला देशाबद्दल प्रेम आहे त्यामुळे..."
7
इन्फोसिसमध्ये वर्षात तिसरी नोकरकपात! १९५ कर्मचाऱ्यांना दाखवला बाहेरचा रस्ता; काय आहे कारण?
8
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
9
माजी पाकिस्तानी खासदार भारतात हलाखीच्या परिस्थितीत; कुल्फी विकून उदरनिर्वाह, कोण आहेत ?
10
माणुसकी म्हणून तरी आमच्या भावनांशी खेळू नका; पहलगामच्या राजकारणावर असावरीच्या आईची प्रतिक्रिया
11
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
12
देशाच्या सुरक्षेचा विषय असेल तर हेरगिरी करण्यात काय अडचण?; पेगाससवरुन सुप्रीम कोर्टाचा सवाल
13
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
14
आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडं षटक, ६ चेंडूत दिल्या ३७ धावा, गोलंदाजाचं नाव ऐकून चकीत व्हाल
15
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
16
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
17
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
18
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
19
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
20
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण

संजीवनगरला युवकाची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2018 00:45 IST

घरातील पंख्यास गळफास घेऊन २९ वर्षीय युवकाने आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी (दि़१४) सकाळच्या सुमारास अंबड औद्योगिक वसाहतीतील संजीवनगरमध्ये घडली़

नाशिक : घरातील पंख्यास गळफास घेऊन २९ वर्षीय युवकाने आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी (दि़१४) सकाळच्या सुमारास अंबड औद्योगिक वसाहतीतील संजीवनगरमध्ये घडली़ विनोद प्रसाद (रा. भवानी रो हाऊस, संजीवनगर) असे आत्महत्या करणाऱ्या युवकाचे नाव आहे. दरम्यान, आत्महत्येचे कारण समजू शकले नाही.कारमधून गोवंशीय मांस जप्तकोकणीपुरा परिसरात संशयास्परित्या उभ्या असलेल्या ओम्नी कारमधून (एमएच १५, ईबी ८७६२) भद्रकाली पोलिसांनी १ हजार १५० रुपये किमतीचे ३० किलो गोवंशीय मांस शुक्रवारी (दि़१४) सकाळच्या सुमारास जप्त केले़ या प्रकरणी अल्ताफ मुश्ताक शेख (२९, रा. भद्रकाली) या संशयितास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.दुचाकीस्वारांनी  मोबाइल चोरला गिरणीत दळण घेऊन गेलेल्या इसमाने बाहेरील बाकावर ठेवलेला महागडा मोबाइल पल्सर दुचाकीवरील दोघा संशयितांनी चोरून नेल्याीची घटना गुरुवारी रात्री पंचवटीतील मीनाताई ठाकरे स्टेडियमजवळ घडली़ या प्रकरणी जितेद्र कार्लेकर (३६ रा.सनराइज अपा, कमलनगर) यांच्या फिर्यादीनुसार पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़सिडको भागात बुलेटची चोरी सिडकोतील आषाढ सेक्टरमधील रहिवासी योगेश ठाकरे (हंसनी निवास) यांची ५० हजार रुपये किमतीची रॉयल एनफिल्ड बुलेट (एमएच १५ एफबी ९१००) चोरट्यांनी घराजवळून चोरून नेली़ या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात दुचाकीचोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़गोरक्षनगरला दुचाकीची चोरी दिंडोरीरोडवरील गोरक्षनगरमधील गणेश बैरागी (सूरशक्ती अपार्टमेंट) यांची सीडी डीलक्स दुचाकी चोरट्यांनी त्यांच्या अपार्टमेंटच्या पार्किंगमधून चोरून नेली़ या प्रकरणी म्हसरूळ पोलीस ठाण्यात दुचाकीचोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़शाळकरी मुलीचा विनयभंग शालेय विद्यार्थिनीचा पाठलाग करीत धमकी देऊन विनयभंग केल्याची घटना जेलरोड परिसरात घडली आहे़ याप्रकरणी जेलरोड परिसरातील गोसावीनगरमध्ये राहणाºया अल्पवयीन मुलास उपनगर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.उपनगर पोलीस ठाण्यात पीडित शाळकरी विद्यार्थिनीने दिलेल्या फिर्यादीनुसार १ डिसेंबर २०१७ ते १२ डिसेंबर २०१८ या कालावधीत संशयित मुलगा हा तिच्या घराजवळ तसेच शाळेत येता-जाता पाठलाग करीत असे़ संशयिताने मुलीस रस्त्यात अडवून प्रेमाची मागणी केली. तसेच तुझ्या भावाचा अपघात करील अशी धमकी देऊन तिचा विनयभंग केला़

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयCrime Newsगुन्हेगारी