शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
3
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
4
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
5
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
6
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
7
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
8
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
9
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
10
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
11
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
12
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
13
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
14
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
15
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
16
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
17
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
18
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
19
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
20
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

संजय वाघ यांना बालसाहित्यिक पुरस्कार प्रदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2019 01:20 IST

मुलांनी पुस्तके वाचावी, अशी अपेक्षा बाळगणाऱ्या पालकांनी प्रथम टीव्ही, मोबाइलपासून दूर राहत पुस्तके वाचावीत. आपण त्यांच्यासमोर हा आदर्श घालून दिला तरच मुलांचा पुस्तक वाचनाकडील कल वाढेल असे प्रतिपादन हृदयरोगतज्ज्ञ डॉ. अनिरुद्ध धर्माधिकारी यांनी केले. त्याआधी सावाना बालभवनच्या वतीने ‘लोकमत’चे मुख्य उपसंपादक संजय वाघ यांना सर्वोत्कृष्ट बालसाहित्यिक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

ठळक मुद्देसावानाचा उपक्रम : पुरस्कार सोहळ्याचे आयोजन

नाशिक : मुलांनी पुस्तके वाचावी, अशी अपेक्षा बाळगणाऱ्या पालकांनी प्रथम टीव्ही, मोबाइलपासून दूर राहत पुस्तके वाचावीत. आपण त्यांच्यासमोर हा आदर्श घालून दिला तरच मुलांचा पुस्तक वाचनाकडील कल वाढेल असे प्रतिपादन हृदयरोगतज्ज्ञ डॉ. अनिरुद्ध धर्माधिकारी यांनी केले. त्याआधी सावाना बालभवनच्या वतीने ‘लोकमत’चे मुख्य उपसंपादक संजय वाघ यांना सर्वोत्कृष्ट बालसाहित्यिक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.सार्वजनिक वाचनालयाच्या बालभवनतर्फे मु. शं. औरंगाबादकर सभागृहात या पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी व्यासपीठावर सावानाचे कार्याध्यक्ष जयप्रकाश जातेगावकर, किशोर पाठक, अ‍ॅड. अभिजीत बगदे, नगरसेविका सरिता सोनवणे, श्रीकांत बेणी, शंकर बर्वे, लेखक डॉ. विशाल तायडे, संजय करंजकर, ‘रात्रीस खेळ चाले’ मालिकेतील छायाची भूमिका साकारणारी मिताली साळगावकर आदी मान्यवर उपस्थित होते. मनपाच्या ३२ शाळांमधील विद्यार्थ्यांनी तीन लेखकांच्या पुस्तकांचे वाचन करून मतदान पद्धतीने वाघ यांच्या ‘जोकर बनला किंगमेकर’ या बालकादंबरीला सर्वाधिक पसंती दिल्याने त्यांना पुरस्कार जाहीर झाला होता. यावेळी मान्यवरांच्या हस्ते वाघ यांना स्मृतिचिन्ह आणि पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.विभक्त कुटुंब पद्धतीमुळे हल्लीची मुले आजी-आजोबांकडून होणाºया संस्कारास मुकले असून, आत्मविश्वास हरवून बसले आहेत. त्यांना प्रेरणा मिळावी यासाठी ‘जोकर बनला किंगमेकर’ या बालकादंबरीची निर्मिती केल्याचे वाघ यांनी यावेळी सांगितले. तायडे यांनीदेखील मनोगत व्यक्त केले. यावेळी बालकलाकार मिताली हिची उपस्थित विद्यार्थ्यांनीच विविध प्रश्न विचारून मुलाखत घेण्यात आली. प्रास्ताविक करंजकर यांनी तर सूत्रसंचालन सुरेखा बोºहाडे यांनी केले.बालसाहित्य निर्मितीस चालना : डॉ़ धर्माधिकारीयावेळी बोलताना डॉ. धर्माधिकारी यांनी या उपक्रमाची मुक्त कंठाने प्रशंसा केली. तसेच सावानाच्या अशा उपक्रमांमुळे दर्जेदार बालसाहित्याच्या निर्मितीस अधिकाधिक चालना मिळेल, असे सांगितले. सरिता सोनवणे यांनी यंदा या उपक्रमात मनापच्या ३२ शाळाच सहभागी झाल्या असल्या तरी पुढील वर्षापासून सर्व ९० शाळा सहभागी होणार असल्याचे नमूद केले.

टॅग्स :Nashikनाशिकcultureसांस्कृतिक