शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
3
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
4
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
5
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
6
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
7
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
8
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
9
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
10
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
11
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
12
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
13
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
14
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
15
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
16
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
17
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
18
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
19
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

“आघाडीमध्ये पारदर्शकता होती म्हणून भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्यात यश”: संजय राऊत

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2021 13:57 IST

सत्ता स्थापन करताना कोणत्याही प्रकारचा दगड आडवा येऊ नये, याची काळजी आम्ही स्वत: घेतली होती.

नाशिक: राष्ट्रवादी नेते आणि उपमख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आणि  भाजप नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या पहाटेच्या शपथविधीवरून पुन्हा एकदा राजकारणात चर्चा रंगायला सुरुवात झाली आहे. याचे कारण म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी एका मराठी दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत केलेले मोठे गौप्यस्फोट. यावर प्रतिक्रिया देताना शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले की, महाविकास आघाडीमध्ये पारदर्शकता होती. सर्वांना गोष्टी माहिती होत्या. म्हणूनच अजित पवारांसह अन्य आमदार परत आले आणि भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यात यश आले.

संजय राऊत नाशिक दौऱ्यावर आले होते. ज्या वेळी महाराष्ट्रात भाजपला सत्ता स्थापन करायची होती त्यावेळी सत्तेच्या नशेमुळे भाजप कोणाबरोबरही जाऊन सत्ता स्थापन करण्यास तयार होती. मग त्यांनी शरद पवारांना ही ऑफर दिली होती. हे आम्हाला सर्वांना माहिती होते. एवढेच नाही तर उपमुख्यमंत्री अजित पवार हे फडणवीस यांच्याबरोबर सत्ता स्थापन करणार आहेत. एवढेच स्पष्ट पारदर्शकता महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये होती. कारण आम्हाला सत्ता स्थापन करायची होती आणि सत्ता स्थापन करताना कोणत्याही प्रकारचा दगड आडवा येऊ नये, याची काळजी आम्ही स्वतः घेतली होती, असा दावा संजय राऊत यांनी केला. 

शरद पवार सांगत आहेत, त्याअर्थी ते खरे असायला हवे

ज्याअर्थी शरद पवार हे सांगत आहेत, त्याअर्थी ते खरे असायला हवे. कारण त्यावेळी भाजपा सरकार स्थापन करण्यासाठी इतकी उत्तेजित झाली होती की, काहीही करुन त्यांना महाराष्ट्रात सत्ता स्थापन करायची होती. मग याच्याशी बोला, त्याच्याशी बोला, याला फोडा, अजित पवारांना गाठा, आमच्या लोकांना गाठा असा मोठा उपक्रम सुरु होता. आम्ही एकमेकांपासून कोणतीही गोष्ट लपवत नव्हतो. आमच्याकडे गुप्त काही नव्हते. कोण काय बोलते, कुणाला भेटते याबाबत पारदर्शकता होती. याबाबत भाजपाला माहिती नव्हते. त्या पारदर्शकतेमुळे त्यांचे सरकार येऊ शकले नाही. अजित पवार शपथ घेण्यासाठी गेले त्यातही पारदर्शकता होती. म्हणूनच अजित पवारांसोबत सगळे आमदार परत आले, असे संजय राऊत म्हणाले. 

टॅग्स :Mahavikas Aghadiमहाविकास आघाडीSanjay Rautसंजय राऊत