इगतपुरी : कोरोनावर नियंत्रण ठेवण्यासाठी नाशिक-ठाणे जिल्हा सरहद्दीवरील घाटनदेवी चेकपोस्टवर सॅनिटायझर गेट कार्यान्वित करण्यात आले आहे.या चेकपोस्टवर कार्यरत कर्मचाऱ्यांमध्ये पोलीस, महसूल, आरोग्य, ग्रामविकास विभागाच्या कर्मचाऱ्यांचा सहभाग आहे. या सर्व कर्मचाºयांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी आमदार हिरामण खोसकर, घोटी कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती गोरख बोडके यांच्या प्रयत्नातून या ठिकाणी सॅनिटायझर गेट उभारण्यात आले. उद्घाटन आमदार खोसकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पोलीस उपअधीक्षक अरु धंती राणे, पोलीस निरीक्षक अशोक रत्नपारखी, महामार्ग सुरक्षा पोलीस निरीक्षक अमोल वालझाडे, घोटी बाजार समितीचे उपसभापती गोरख बोडके, खरेदी विक्र ी संघाचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लहाणे, शहराध्यक्ष वसीम सैयद, कमलाकर नाठे, कुणाल शिंपी, महेश शिरोळे, नितीन गांगोडे, सुनील काळे, एम. टी महाले, नंदकुमार मोरे, सचिन धारणकर, विजय काळे, अडांगळे, जाखेरे, पोलीस हवालदार एस. आर. गांगुर्डे, यू. एम खालकर, सुरेश पाटील, एस. आर. माळोदे, आर. एम. गांगुर्डे आदी उपस्थित होते.कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांच्या आदेशाने जिल्हा सरहद्दीवरील सर्व प्रमुख मार्गांवर चेकपोस्ट कार्यान्वित करण्यात आलेआहेत.मुंबई-आग्रा महामार्गावरील इगतपुरी येथील घाटनदेवीजवळ हा चेकपोस्ट उभारण्यात आला आहे. येथे महामार्ग सुरक्षा वाहतूक पोलीस निरीक्षक अमोल वालझाडे यांच्या पथकाकडून मुंबईहून नाशिक जिल्ह्यात येणारे व नाशिकहून मुंबईला जाणाºया वाहनांची कसून तपासणी करण्यात येत आहे.
घाटनदेवी चेकपोस्टवर सॅनिटायझर गेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2020 00:30 IST