शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

सॅनिटायझरच्या खपात दहापटीने वाढ !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2020 00:28 IST

कोरोनाच्या धसक्याने धास्तावलेल्या नागरिकांकडून सॅनिटायझरची तुफान खरेदी केली जात आहे. ज्या मेडिकलच्या दुकानांतून महिन्याला तीन-चार सॅनिटायझरची विक्री व्हायची तिथून आता महिनाभरात चाळीस-पन्नास सॅनिटायझर, तर ज्या दुकानांतून महिन्याला शे-दीडशे सॅनिटायझर जायचे, त्या दुकानांमधून दिवसाला शे-दीडशे बॉटल्सचा खप होत आहे. त्यामुळे कोरोनाने या सॅनिटायझर्सचीच सर्वाधिक चांदी झाली आहे.

ठळक मुद्देआदेश : सॅनिटायझर आणि मास्कचा अत्यावश्यक वस्तुंमध्ये अंतर्भाव

नाशिक : कोरोनाच्या धसक्याने धास्तावलेल्या नागरिकांकडून सॅनिटायझरची तुफान खरेदी केली जात आहे. ज्या मेडिकलच्या दुकानांतून महिन्याला तीन-चार सॅनिटायझरची विक्री व्हायची तिथून आता महिनाभरात चाळीस-पन्नास सॅनिटायझर, तर ज्या दुकानांतून महिन्याला शे-दीडशे सॅनिटायझर जायचे, त्या दुकानांमधून दिवसाला शे-दीडशे बॉटल्सचा खप होत आहे. त्यामुळे कोरोनाने या सॅनिटायझर्सचीच सर्वाधिक चांदी झाली आहे.सॅनिटायझर जे एकेकाळी केवळ लक्झरी कारधारक आणि मोठमोठ्या कॉर्पोरेट कार्यालयांचीच मक्तेदारी गणली जात होती. त्यामुळे त्यांची विक्रीदेखील खूप मर्यादित होती. त्या परिस्थितीत सॅनिटायझर हा शब्ददेखील सामान्य नागरिकांना फारसा परिचित नव्हता. मात्र, गत दोन महिन्यांपासून कोरोनाच्या प्रादुर्भावाची दहशत वाढू लागल्यापासून खबरदारीचा उपाय म्हणून सॅनिटायझरच्या विक्रीत वाढ होऊ लागली. मात्र, फेब्रुवारीच्या मध्यापासून सॅनिटायझरचा खप प्रचंड प्रमाणात वाढण्यास प्रारंभ झाला. हे प्रमाण अल्पावधीत दहा पटीपेक्षाही अधिक वाढल्याचे मेडिकल व्यावसायिकांनी सांगितले. त्यातही गत दोन आठवड्यांमध्ये हे प्रमाण सर्वाधिक वाढले आहे.सॅनिटायझर जीवनावश्यक यादीतकरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र सरकारने आणखी एक मोठा निर्णय घेतला आहे. सरकारने मास्क आणि सॅनिटायझर अत्यावश्यक वस्तूंमध्ये समावेश केला आहे. त्यामुळे मास्क आणि सॅनिटायझरचा काळाबाजार आणि साठेबाजी करणाऱ्यांवर आळा घालण्याचा प्रयत्न आहे. ग्राहक संरक्षण आणि अन्न व नागरी पुरवठा मंत्रालयाने यासंदर्भात आदेश जारी केला आहे. कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारांकडून वेगवेगळ्या पातळीवर उपाययोजना करण्यात येत आहेत. यानंतर केंद्र सरकारने मास्क आणि सॅनिटायझरचा काळा बाजार आणि साठेबाजी रोखण्यासाठी मोठा निर्णय घेतला आहे. मास्क आणि सॅनिटायझरचा केंद्र सरकारने अत्यावश्यक वस्तूंमध्ये समावेश केला आहे. यात सर्जिकल मास्क, एन ९५ मास्कचा समावेश असेल. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी तात्पुरता हा निर्णय घेण्यात आला असून, शासनाचा हा आदेश ३० जूनपर्यंत लागू राहणार आहे.

टॅग्स :Nashikनाशिकcorona virusकोरोनाHealthआरोग्य