सटाणा : कर वाढ न करता शहरवासीयांना दिलासा देत पाणीपुरवठा, स्वच्छता, रस्ते अशा मूलभूत कामांसाठी तरतूद असलेल्या १०७ कोटी रुपयांच्या अर्थसंकल्पाला गुरुवारी झालेल्या पालिकेच्या सभेत मंजुरी देण्यात आली. ३१ लाख ६८ हजार शिलकी अंदाजपत्रकालाही मंजुरी देण्यात आली. यावेळी विविध विषयांवर चर्चादेखील करण्यात आली़ नगराध्यक्ष सुनील मोरे यांच्या अध्यक्षतेखाली सभा झाली. मुख्याधिकारी हेमलता डगळे यांनी वाचन केले. स्थायीत सादर अर्थसंकल्पाला मंजुरी देण्यात आली. सभेस सुवर्णा नंदाळे, नगरसेवक राकेश खैरनार, महेश देवरे, विरोधी गटनेते काका सोनवणे, दिनकर सोनवणे, राहुल पाटील, सुनीता मोरकर, निर्मला भदाणे, दीपक पाकळे, मुन्ना शेख, शमा मन्सुरी, शमीन मुल्ला, पुष्पा सूर्यवंशी, संगीता देवरे, भारती सूर्यवंशी, सोनाली बैताडे, डॉ. विद्या सोनवणे, सुरेखा बच्छाव, मनोहर देवरे, सुलोचना चव्हाण, लेखापाल माणिक वानखेडे उपस्थित होते़ दरम्यान पालिका सभागृहातील बैठकीत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली़
सटाणा पालिकेच्या १०७ कोटींच्या अर्थसंकल्पास मंजुरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2018 01:31 IST
सटाणा : कर वाढ न करता शहरवासीयांना दिलासा देत पाणीपुरवठा, स्वच्छता, रस्ते अशा मूलभूत कामांसाठी तरतूद असलेल्या १०७ कोटी रुपयांच्या अर्थसंकल्पाला गुरुवारी झालेल्या पालिकेच्या सभेत मंजुरी देण्यात आली.
सटाणा पालिकेच्या १०७ कोटींच्या अर्थसंकल्पास मंजुरी
ठळक मुद्देस्थायीत सादर अर्थसंकल्पाला मंजुरीशिलकी अंदाजपत्रकालाही मंजुरी