लासलगाव : अखिल भारतीय माहेश्वरी मंडळ अंतर्गत राजस्थानी महिला मंडळ लासलगाव यांच्याकडून सामाजिक भावनेतून वनस्थळी ग्रामीण महिला व बालविकास केंद्र येथे सॅनिटरी नॅपकिन वेंडिंग मशीन बसविण्यात आले. महिलांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून हे एक महत्वाचे पाऊल उचलण्यात आल्याने समाधान व्यक्त करण्यात आले.याप्रसंगी आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉक्टर काळे तसेच पुष्पा दरेकर व वैष्णवी पाटील या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. या वेळी वैष्णवी पाटील यांनी सदर मशीनचे उद्घाटन केले. त्यानंतर या मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले.राजस्थानी महिला मंडळ अध्यक्ष शकुंतला मालपाणी, उपाध्यक्ष सुनिता वर्मा, नाशिक जिल्हा कोषाध्यक्ष नीता डागा, राजस्थानी महिला मंडळ लासलगाव कोषाध्यक्ष विमल राठी तसेच सचिव संगीता पलोड, वनस्थळी व्यवस्थापिका अनिता गंधे या सर्वांनी कार्यक्र मासाठी यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.कार्यक्र मासाठी ज्येष्ठ नागरिक संघ अध्यक्ष उषा पवार, नेहा खानापूरकर, बेंडाळे, यशश्री जोशी, कल्पना जोशी, उर्मिला जगताप, लीला जेजुरकर, प्रतिभा राऊत, संगीता माने, मंगल दीक्षित आदींसह गावातील मान्यवर महिला उपस्थित होत्या. कार्यक्र माचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन अनिता गंधे यांनी केले.
लासलगाव वनस्थळीस सँनिटरी नॅपकिन व्हेंडिंग मशिन भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2019 18:40 IST
लासलगाव : अखिल भारतीय माहेश्वरी मंडळ अंतर्गत राजस्थानी महिला मंडळ लासलगाव यांच्याकडून सामाजिक भावनेतून वनस्थळी ग्रामीण महिला व बालविकास केंद्र येथे सॅनिटरी नॅपकिन वेंडिंग मशीन बसविण्यात आले. महिलांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून हे एक महत्वाचे पाऊल उचलण्यात आल्याने समाधान व्यक्त करण्यात आले.
लासलगाव वनस्थळीस सँनिटरी नॅपकिन व्हेंडिंग मशिन भेट
ठळक मुद्देमहिलांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून हे एक महत्वाचे पाऊल