शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

उन्हाळी कांद्याने केला शेतकऱ्यांचा वांधा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2018 18:21 IST

कसमादे परिसरातील शेतकºयांचे प्रमुख आणि हक्काचे पीक म्हणून ओळख असलेल्या कांद्याने सध्यातरी शेतकºयांचा वांधा केल्याचे चित्र असून, भाववाढीच्या अपेक्षेने वर्षभर सांभाळलेला अर्धा चाळीतच सडला तर उरलेला अर्धा कवडीमोल दराने विकला जात असल्यामुळे उत्पादन खर्च निघणेदेखील कठीण झाल्याने आर्थिक गणित बिघडले असून, पुन्हा एकदा बळीराजा कर्जाच्या खायीत लोटला जात आहे.

ठळक मुद्देहवालदिल : अर्धा चाळीत सडला तर उरलेल्याला कवडीमोल भाव

वटार : कसमादे परिसरातील शेतकºयांचे प्रमुख आणि हक्काचे पीक म्हणून ओळख असलेल्या कांद्याने सध्यातरी शेतकºयांचा वांधा केल्याचे चित्र असून, भाववाढीच्या अपेक्षेने वर्षभर सांभाळलेला अर्धा चाळीतच सडला तर उरलेला अर्धा कवडीमोल दराने विकला जात असल्यामुळे उत्पादन खर्च निघणेदेखील कठीण झाल्याने आर्थिक गणित बिघडले असून, पुन्हा एकदा बळीराजा कर्जाच्या खायीत लोटला जात आहे.कांद्याचे दर दररोज घसरत असल्याने शेतकºयांच्या डोळ्यात पाणी आले आहे. मागील वर्षी कांद्याला चांगला दर मिळाल्याने मोठ्या प्रमाणात शेतकºयांनी उन्हाळी कांदा चाळीत साठवून ठेवला; मात्र कांद्याचे बाजार कोसळल्याने आता कांदा सरासरी ३०० ते ४०० रु पये प्रतिक्विंटल दराने विक्र ी होत आहे. या विक्र ीतून उत्पादन खर्चही निघत नसल्याने शेतकºयांची आर्थिक घडी विस्कळीत झाली आहे.फेब्रुवारी-मार्च महिन्यात साठविलेला कांदा नऊ महिन्यांनी शेतकरी बाजारात विक्र ीसाठी आणत आहे. या कांद्याला मार्च महिन्याच्या तुलनेत नगण्य भाव मिळत असल्याने बळीराजा चिंताग्रस्त झाला आहे. यंदा कांद्याने पूर्ण वर्षाचे गणित बिघडविले असल्याची भावना शेतकºयांमध्ये आहे. मागील वर्षी याच कांद्याला दोन हजारापर्यंत भाव मिळाला होता. यंदा सद्यस्थितीत सरासरी ३०० ते ४०० रु पये दर कांद्याला मिळत आहे.गेल्या वर्षी लाल कांद्याला चांगला भाव मिळाला. यंदा पन्नास टक्के उत्पादन घटलेले असताना लाल कांद्याच्या दरानेदेखील माना टाकल्या आहेत.साठविलेल्या कांद्याला आज मातीमोल भावफेब्रुवारी-मार्च महिन्यापासून शेतकºयांनी उन्हाळी कांदा चाळीत साठवून ठेवला आहे. मार्च महिन्यात कांद्याला सर्वसाधारण भाव हा ७०० ते ८०० रु पये इतका होता. आज हा कांदा बाजारात विक्र ीसाठी आणला जात आहे. त्याला ३०० ते ४०० रु पये प्रतिक्विंटल दर मिळत आहे. साठविलेल्या कांद्याला आज मातीमोल भावाने विकला जात आहे. गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात उन्हाळी कांद्याला उच्चांकी भाव चार हजाररु पयापर्यंत गेला होता.यंदाही चांगला भाव मिळेल या अपेक्षेने मोठ्या प्रमाणात कांदाचाळीत साठवणूक केली होती; मात्र सरकारने शेतकºयांना अच्छे दिन दाखवत याच दिवसात चार हजार रु पये जाणारा कांदा चारशे रु पयांवर आणून ठेवल्याने शेतकरी वर्गातून संताप व्यक्त केला जात आहे. चालू वर्षी फक्त आॅक्टोबर महिन्यात फक्त तीनच दिवस कांद्याला सरासरी दोन हजारपेक्षा जास्त बाजारभाव मिळाला; मात्र त्यानंतर आजपर्यंत कांद्याच्या दरात एका पैशाचीसुद्धा वाढ झाली नसून कसमादेतील सर्व बाजार समित्यांमध्ये कांद्याला सरासरी ३०० ते ४०० रु पयांचा दर मिळत आहे.

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्रonionकांदाFarmerशेतकरी