शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
2
'मला रिकामं ठेवू नका'; धनंजय मुंडेंच्या विनंतीवर अजित पवार म्हणाले, 'सूचनेचे पालन केलं जाईल'
3
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
4
'सुप्रीम कोर्ट आता बेल कोर्ट बनलं आहे'; जामीन अर्जांची संख्या पाहून न्यायमूर्ती नागरत्ना यांनी व्यक्त केली चिंता
5
IND vs AUS : मॅच आधी टीम इंडियाचा कॅप्टन बदलला! श्रेयस अय्यर अचानक घरी परतला; कारण....
6
"सनातनी हज यात्रेला जात नाहीत, त्यांच्या लोकांनीही...; गरबा मंडपाच्या दरवाजावर गोमूत्र ठेवा!"; धीरेंद्र शास्त्री यांचा सल्ला
7
"२० ओव्हर्स टिकणार त्या दिवशी २०० धावा ठोकणार"; अभिषेक शर्मासंदर्भात मोठी भविष्यवाणी
8
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
9
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
10
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
11
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
12
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
13
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
14
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
15
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
16
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
17
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
18
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना
19
भारताकडून हरल्यावर पाकिस्तानचा रडीचा डाव, या गोष्टीवरून पुन्हा ICCकडे केली तक्रार  
20
शेअर असावा तर असा...! सरकारची एक घोषणा अन् थेट ₹4000 नं वाढला; एकाच दिवसात केली कमाल, गुंतवणूकदारांना केलं मालामाल!

सॅम्युअलला पोलिसांचा अनोखा ‘सॅल्यूट’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2019 01:15 IST

जिवाची पर्वा न करता प्रसंगावधान राखत धाडस दाखवून सशस्त्र दरोडेखोरांशी झुंज देणाऱ्या मुथूट फायनान्स कार्यालयाचा युवा अभियंता मुरियायिकारा साजू सॅम्युअलने (२९, रा. मूळ केरळ) शौर्यपूर्ण कामगिरी बजावली.

नाशिक : जिवाची पर्वा न करता प्रसंगावधान राखत धाडस दाखवून सशस्त्र दरोडेखोरांशी झुंज देणाऱ्या मुथूट फायनान्स कार्यालयाचा युवा अभियंता मुरियायिकारा साजू सॅम्युअलने (२९, रा. मूळ केरळ) शौर्यपूर्ण कामगिरी बजावली. त्याचा आक्रमक प्रतिकार थोपविण्यासाठी दरोडेखोरांनी त्याच्यावर गोळीबार केला. यामुळे सॅम्युअलचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. सॅम्युअलच्या धाडसाचे कौतुक करत शहर पोलीस आयुक्तालयातील गुन्हे शाखांच्या तपासी पथकाला मिळालेली प्रत्येकी ७० हजार असे एकूण दोन लाख दहा हजार रुपयांच्या बक्षिसाची रक्कम सॅम्युअल कुटुंबाला मदत म्हणून देण्याचे सहायक आयुक्त रमेश पाटील यांनी जाहीर केले.सहा फूट उंचीच्या धाडसी सॅम्युअलने दरोडेखोरांचा हल्ला रोखण्यासाठी थेट आपत्कालीन अलार्म वाजविला. यामुळे सर्वांना धोक्याची जाणीव झाली आणि दरोडेखोर बिथरले. दरोडेखोरांना त्यांचा कट उद््ध्वस्त होण्याची भीती निर्माण झाली. झटापट करणाºया सॅम्यूअलवर चिडलेल्या परमेंदरने पिस्तूलने तीन गोळ्या त्याच्या शरीरावर झाडल्या. काही सेकंदात सॅम्यूअल रक्ताच्या थारोळ्यात कोसळला. यानंतर परमेंदरचा साथीदार संशयित हल्लेखोर आकाशसिंग याने त्याच्याजवळी पिस्तूलने दोन गोळ्या झाडून पळ काढला.जिवावर उदार होऊन सॅम्यूअलने कुठल्याही बाबीचा विचार न करता कार्यालय व त्यामधील कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा विचार करत दरोडेखोरांसोबत झुंज दिली. त्यामुळे ग्राहकांचे कोट्यवधींचे सोने सुरक्षित राहिले. सॅम्युअलच्या या धाडसाने पोलिसांचीही मने जिंकली. या हल्ल्यात निष्पाप सॅम्यूअलचा मृत्यू झाल्याने शहर पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील, उपआयुक्त पौर्णिमा चौगुले यांच्यासह गुन्हे शाखांचे तपासी पथकाने या गुन्ह्याचा छडा लावण्याचा चंग बांधला. राज्यासह परराज्यांमध्ये पोलिसांचे दहा पथक या गुन्ह्याचा छडा लावण्यासाठी सक्रीय आहेत़ तीन पथकांना दोन संशयित आरोपींना ताब्यात घेण्यास यश आले असून गुन्ह्याचाही उलघडा झाला आहे़सॅम्युअलला सात महिन्यांची चिमुकलीसॅम्युअल हा अभियंता होता. मुंबईच्या विभागीय कार्यालयातून नाशिकच्या मुथूट कार्यालयातील यंत्रणेची दुरुस्ती करण्यासाठी सॅम्युअल आला होता. सॅम्युअल विवाहित असून, त्याच्या पश्चात पत्नी व सात महिन्यांचे बाळ आहे. सॅम्युअल कुटुंबाचा मोठा आधार होता. याची जाणीव ठेवत पोलिसांनी त्याच्या कुटुंबीयांना आर्थिक मदतीचा हात दिला.सॅम्युअल कुटुंबाला दिला मदतीचा हात४आठवडाभरात पोलिसांनी या गुन्ह्याचा उलगडा करत आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश केला. गुन्ह्याचा सूत्रधार जितेंद्रसिंग व शूटर परमेंद्र सिंगला बेड्या ठोकल्या. आठवडाभरात आव्हानात्मक गुन्ह्याचा छडा लावल्याबद्दल नांगरे-पाटील यांनी तीनही तपासी पथकांना प्रत्येकी ७० हजारांचे बक्षीस जाहीर केले. सामाजिक संवेदना जागृत ठेवत पोलिसांच्या तपास पथकांनी बक्षिसाची मिळालेली दोन लाख दहा हजारांची रक्कम सॅम्युअल कुटुंबाला मदत म्हणून देण्याचा निर्णय घेत अनोखा ‘सॅल्यूट’ केला.

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयRobberyदरोडा