शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

‘समृद्धी’ बाधितांचे माजी मुख्यमंत्र्यांना साकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2018 01:28 IST

समृद्धी महामार्गासाठी थेट खरेदीद्वारे ७५ टक्क्यांच्यावर भूसंपादन झाले असताना इगतपुरी तालुक्यातील वाढत्या विरोधामुळे रद्द करण्यात आलेले कवडदरा व देवळे येथील नोड इगतपुरीपासून तळोशी शिवारापर्यंत करण्याच्या सुप्त हालचाली सुरू झाल्याने त्यास शेतकऱ्यांनी विरोध दर्शविला आहे.

घोटी : समृद्धी महामार्गासाठी थेट खरेदीद्वारे ७५ टक्क्यांच्यावर भूसंपादन झाले असताना इगतपुरी तालुक्यातील वाढत्या विरोधामुळे रद्द करण्यात आलेले कवडदरा व देवळे येथील नोड इगतपुरीपासून तळोशी शिवारापर्यंत करण्याच्या सुप्त हालचाली सुरू झाल्याने त्यास शेतकऱ्यांनी विरोध दर्शविला आहे. याविरोधात विधिमंडळात आवाज उठवण्यासाठी समृद्धिबाधित शेतकºयांनी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना साकडे घातले आहे.  नाशिक दौºयावर आलेल्या माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी विविध प्रश्नांना हात घातला. त्यात समृद्धिबाधित संघर्ष समितीचे तथा इंटकचे इगतपुरी तालुकाध्यक्ष भास्कर गुंजाळ यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने चव्हाण यांची भेट घेत आपली कैफियत मांडली. समृद्धी महामार्गास झालेला विरोध पाहता प्रशासनाने नोडसाठी सावध  भूमिका घेतली होती; मात्र मुख्यमंत्र्यांच्या महत्त्वाकांक्षी असलेल्या या प्रकल्पात स्मार्ट सिटी करण्याचा प्रशासनाचा मानस लपून राहिलेला नाही. त्यामुळे येणाºया काळात समृद्धीपेक्षाही मोठे जनआंदोलन उभारण्याचा मानस गुंजाळ यांनी व्यक्त केला.  याबाबत समृद्धिबाधितांनी विधिमंडळात आवाज उठविण्याची विनंती चव्हाण यांना केली.  यावेळी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष संपतराव सकाळे,  पंचायत समिती सदस्य सोमनाथ जोशी, युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष सचिन मते, विजय खातळे, सरपंच किसन गिते, अशोक धोंगडे, सुखदेव धोंगडे, रमेश देवगिरे आदी उपस्थित होते.गत सत्तावीस महिन्यांपासून समृद्धी महामार्गाविरोधात आंदोलन करीत असताना भूसंपादन कायद्याच्या अंतर्गत संपादन प्रक्रि या राबवावी अशी आमची पहिल्यापासून मागणी होती; मात्र प्रशासनाने त्यास केराची टोपली दाखविली आहे. त्यात आमच्या तालुक्यातील ७५ टक्के जमिनी सरकारने संपादन केल्या असताना स्मार्ट सिटीच्या नावाखाली परत एकदा जमिनी सरकार घेणार असेल तर त्याविरोधात मोठा लढा उभारण्यात येईल.- भास्कर गुंजाळ, अध्यक्ष, समृद्धिबाधित संघर्ष समिती

टॅग्स :Samruddhi Mahamargसमृद्धी महामार्गPrithviraj Chavanपृथ्वीराज चव्हाण