मालेगाव/येवला : मालेगाव येथील सामान्य रुग्णालयात आणखी एक कोरोना संशयितास दाखल करण्यात आले असून त्याच्या घशाच्या स्रावाचे नमुने पुणे येथील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. सदर व्यावसायिक दुबई येथून परतला आहे. याचबरोबर येवला शहरात सौदी अरेबियातून आलेल्या एका इसमात कोराने सदृश आजाराची लक्षणे दिसल्याने परिसरातील नागरिकांनी या संशयिताच्या वैद्यकीय चाचण्या होऊन उपचार करण्यासाठी पोलिसांकडे धाव घेतली आहे.
मालेगाव येथील संशयिताचे नमुने रवाना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2020 01:03 IST