शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

सांबरखल गावातील जि. प. शाळेची अवस्था वाईट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2022 00:02 IST

बोरगाव : पंचायत समिती सुरगाणा येथे मौजे रोंगाने गट ग्रामपंचायतींतर्गत एकूण सहा आदिवासी पाड्यांचा समावेश असून, यापैकी सांबरखल गावातील जि. प. शाळेची अवस्था अत्यंत वाईट झालेली आहे.

ठळक मुद्देसुरगाणा : लेखी आश्वासन देऊनही दुुरुस्तीकडे दुर्लक्ष

बोरगाव : पंचायत समिती सुरगाणा येथे मौजे रोंगाने गट ग्रामपंचायतींतर्गत एकूण सहा आदिवासी पाड्यांचा समावेश असून, यापैकी सांबरखल गावातील जि. प. शाळेची अवस्था अत्यंत वाईट झालेली आहे.या शाळेच्या दुरुस्तीचे काम तत्काळ सुरू करावे या व इतर प्रमुख मागण्यांकरिता श्रमजीवी संघटनेच्या वतीने पंचायत समिती सुरगाणा येथे धडक आंदोलन करण्यात आले. यामध्ये गेल्या वर्षीपासूनच सांबरखल गावातील शाळा वादळ-वाऱ्याचा व पावसाचा सामना करत जिल्हा परिषद शाळेची इमारत मोठ्या प्रमाणात नुकसान होऊन शेवटच्या घटका मोजत आहे. त्यामुळे गावातील विद्यार्थ्यांच्या आयुष्याला धोका निर्माण झाला आहे.

विद्यार्थ्यांच्या या विषयावर गावातील नागरिकांनी सुरगाणा पंचायत समितीस शाळा दुरुस्तीसाठी पत्रव्यवहार करून ही गटशिक्षणाधिकारी यांनी शाळेकडे दुर्लक्ष केले. शाळा नाही म्हणून शाळेतील विद्यार्थी कुठंतरी मंदिर किंवा झाडाखाली बसून शिक्षण घेत होते. श्रमजीवी संघटनेच्या वतीने वेळोवेळी पंचायत समिती येथे आंदोलन करण्यात आले असून, गटशिक्षणाधिकारी यांच्या वतीने तात्पुरती आश्वासने देऊन जि. प. शाळा सांबरखल येथील १५ जूनपर्यंत सर्व वर्ग खोल्या दुरुस्त करण्याचे लेखी आश्वासन दिले होते. परंतु १५ जून होऊनही जि. प. शाळेची अवस्था जैसे थे अशीच आहे.कोरोनानंतर १५ जूनपासून प्रत्यक्ष शाळा सुरू झाल्या असून, गटशिक्षणाधिकारी यांनी शाळेची कोणत्याही प्रकारची दुरुस्ती केलेली नाही. देश स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करत असताना आदिवासी पाड्यावरील विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्यासाठी चार भिंतींची शाळाच असू नये ही देशासाठी लाजिरवाणी बाब असल्याचे श्रमजीवी संघटनेचे नाशिक जिल्ह्या उपाध्यक्ष राजू राउत, तालुका सचिव दिनेश मिसाळ, केशव गुंबाडे, तालुका उपाध्यक्ष सीताराम सापटे यांनी यावेळी मत व्यक्त केले.गरीब आदिवासींच्या विद्यार्थ्यांना शाळेत बसण्यासाठी इमारत नाही. यासाठी श्रमजीवी संघटनेने नुकतेच आंदोलन केले, यामध्ये जोपर्यंत इमारत बांधकामास सुरुवात होणार नाही तोपर्यंत हे आंदोलन असेच चालूच राहील, अशी भूमिका संघटनेच्या वतीने घेण्यात आली आहे.- राजू राऊत, तालुका अध्यक्ष, श्रमजीवी संघटना 

टॅग्स :zp schoolजिल्हा परिषद शाळाEducationशिक्षण