शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

समता ज्येष्ठ नागरिक संघ ५५ विद्यार्थ्यांचा खर्च उचलणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2018 00:56 IST

नाशिक : आदिवासी दुर्गम भागातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला चालना देण्यासाठी समता ज्येष्ठ नागरिक संघाने अभिनव उपक्रम हाती घेतला असून, गुणवत्ता असलेल्या इयत्ता दहावीच्या ५५ विद्यार्थ्यांचे परीक्षेचे अर्ज भरण्याची जबाबदारी संघाने उचलली आहे.आदिवासी भागातील मुलांचे शिक्षण अनेकविध कारणांमुळे अपूर्ण राहते. त्यांच्यात चांगली गुणवत्ता असूनही त्यांना केवळ आर्थिक परिस्थितीमुळे कित्येकदा शिक्षण सोडण्याची वेळ ...

नाशिक : आदिवासी दुर्गम भागातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला चालना देण्यासाठी समता ज्येष्ठ नागरिक संघाने अभिनव उपक्रम हाती घेतला असून, गुणवत्ता असलेल्या इयत्ता दहावीच्या ५५ विद्यार्थ्यांचे परीक्षेचे अर्ज भरण्याची जबाबदारी संघाने उचलली आहे.आदिवासी भागातील मुलांचे शिक्षण अनेकविध कारणांमुळे अपूर्ण राहते. त्यांच्यात चांगली गुणवत्ता असूनही त्यांना केवळ आर्थिक परिस्थितीमुळे कित्येकदा शिक्षण सोडण्याची वेळ येते. या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रवासात खंड पडू नये तसेच दहावीचे महत्त्वाचे वर्ष लक्षात घेऊन समता ज्येष्ठ नागरिक संघाने पांजरे येथील नूतन विद्यालयातील इयत्ता दहावीतील ५५ विद्यार्थ्यांचे परीक्षा अर्ज भरण्याची जबाबदारी घेतली आहे.पखालरोडवरील समता ज्येष्ठ नागरिक संघाकडून राबविण्यात येणाऱ्या अनेक सामाजिक कार्यात शिक्षणाला अग्रक्रम असून, यासाठी ज्येष्ठ नागरिकांकडून मदतीचा हात पुढे केला जातो. अकोले तालुक्यातील पांजरे येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतील सुमारे ३०० विद्यार्थ्यांना ज्येष्ठ नागरिक संघाकडून शालेय साहित्यांचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्रीराम ठाकूर होते. व्यासपीठावर उपाध्यक्ष डी. एफ. मोरे, सचिव दीनानाथ पाटील, बळवंत शिर्के, शांताराम पोटे, आर. एस. गरुड, चिंतामण अहेर, कृषी अधिकारी व्ही. आर. बांंबळे, मुख्याध्यापक पी. वाय. लांडगे, सुमन देशमुख उपस्थित होते.या उपक्रमात दीनानाथ पाटील, चिंतामण अहेर, डॉ. ए. जी. वाणी यांचे सहकार्य लाभणार असल्याचे अध्यक्ष ठाकूर यांनी सांगितले. मुख्याध्यापक लांडगे यांनीही मनोगत व्यक्त केले. पाहुण्यांचे स्वागत अर्जुन शेळके यांनी केले. प्रास्ताविक आर. आर. गरुड यांनी केले. रा. शि. शिंदे यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी डॉ. ए. जी. वाणी, व्ही. एस. रासने, प्रा. घोडे, जाधव, संतू भावसार यांचे सहकार्य लाभले.

टॅग्स :Educationशिक्षणNashikनाशिक